शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वल निकम यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

By admin | Updated: February 9, 2015 01:16 IST

दर्शन शहा खून खटला : निकम यांनी घेतली खटल्याची माहिती; आजपासून सुनावणी

कोल्हापूर : शाळकरी मुलगा दर्शन शहा खून प्रकरणाची सुनावणी आज, सोमवारपासून तीन दिवस जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होत आहे. त्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे रविवारी सकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी दहा वाजण्याच्या सुमारास देवकर पाणंद परिसरातील दर्शन शहाच्या घरी भेट दिली. यावेळी निकम यांना पाहून दर्शनच्या आईचे डोळे भरून आले. परिसरात पोलिसांचा फौजफाटा पाहून दर्शनच्या खून प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाला. एकुलत्या एका मुलापासून पोरक्या झालेल्या आईची केविलवाणी अवस्था पाहून उपस्थित पोलीस व नागरिकांचेही डोळे भरून आले. पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी दि. २६ डिसेंबर २०१२ रोजी देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू चांदणे याला अटक केली होती. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. शासनाने या खटल्याच्या सुनावणीसाठी निकम यांची नियुक्ती केली. त्याच्या सुनावणीसाठी ते यापूर्वी २० जानेवारी रोजी कोल्हापुरात आले होते. आता या खटल्याची तीन दिवस टाऊन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. दरम्यान, अ‍ॅड. निकम यांनी रविवारी सकाळी देवकर पाणंद परिसराची पाहणी केली. आरोपींच्या घराची पाहणी केली. तेथूनच काही अंतरावर असलेल्या शेतवडीचीदेखील त्यांनी पाहणी केली. आजूबाजूला किती घरे आहेत, परिसर कसा आहे, आरोपीच्या घरापासून विहीर किती अंतरावर आहे, आरोपीने दर्शनचे अपहरण कोठून केले, उसामध्ये कोणत्या ठिकाणी त्याचा गळा दाबून मारले, तेथून विहिरीत कसे टाकले, या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती त्यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांच्याकडून घेतली.