शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘विकास’ साधण्यासाठी सीतेचा राम अयोध्यातून ‘गोकुळा’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एखाद्याला कोणत्याही गुन्ह्यात गुंतवायचेच असेल, तर त्याला ‘खाकी’ कशाही पध्दतीने गुंतवू शकते, त्यानंतर प्रकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एखाद्याला कोणत्याही गुन्ह्यात गुंतवायचेच असेल, तर त्याला ‘खाकी’ कशाही पध्दतीने गुंतवू शकते, त्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी आर्थिक ढपलाही पाडण्यासाठी यंत्रणा पुढे सरसावते, त्याला प्रतिसाद मिळाली नाही, तर जुन्या गुन्ह्यात कलमे वाढवण्याची शक्कलही लढवली जाते. असाच काहीसा प्रकार कोल्हापूरच्या ‘शाहूनगरी’त घडला. ‘सीता-रामा’च्या फायद्यासाठी वानरसेना घेऊन दुसऱ्याच्या हद्दीत चढाई करून सगळ्यांना घेऊन डुबणाऱ्यांची व ५० लाखांच्या मागणीची चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे.

महिन्यापूर्वी कोल्हापूर शहराच्या ‘शाहूनगरी’त ‘खाकी’ने एका ठिकाणी कारवाई करत स्वत:चा ‘विकास’स साधला. विकासाचे धागेदोरे शोधण्याचे निमित्त काढून त्याच रात्री गुपचूप अंधारात ‘पनामा’ हे लहानग्यांचे खेळण्याचे ठिकाण गाठले. खरे तर ‘गोकुळा’त शिरकाव करून त्यांनी हद्दपारीच केली. बंद पनामाच्या मुख्य गेटवरून आवारात उडया टाकून सात ते आठ ‘खाकी’ च्या वानरसेनेने "सीता-रामा"च्या साक्षीने अक्षरशा दरोडाच टाकला. पनामाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करताना दरवाजाचे शटर, कडीकोयंडा तोडला. आत लाईट न लावताच बॅटरीच्या उजेडात सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ तपासणीत घालवला. पुढे चार दिवसँत ‘पनामा’च्या मालकास ‘खाकी’वर कृपादृष्टी असलेल्या ‘विनायक’ने ५० लाखाचा निरोप धाडला. त्यानंतर आता गेले काही दिवस हा ढपल्यासाठी पाठशिवणीचा खेळ रंगला आहे.

"विनायक" पावला

"राजारामा"च्या नगरीवर अलीकडे मांडवातील "विनायका"ची चांगलीच क्रुपाद्रुष्टी लाभलीय. साहेबांच्या क्रुपेने इथं त्याचा वावर वाढलाय. कोणत्याही शुभलक्ष्मी कामात इथं ४०-६० विभागणीचा डाव ठरलाय. गेल्या महिन्यात मध्यरात्री त्यांचा विकासचा गेम साधला. कारवाईच्या धास्तीनं "खाकी"च्या आवारातच मध्यरात्री दीड वाजता आलिशान गाडीत बसून "विनायका"ने सात लाखाचा डाव साधला. इतक्या मध्यरात्री साहेबही केबीनमध्येच बसूनच होते. काही वेळाने तेही बाहेर येऊन विनायकासोबत हिश्श्याच्या विभागणीसाठी गाडीतून निघून गेले. आवारातील तिसऱ्या डोळ्यांची तपासणी केल्यास सारेच प्रकाशमान होईल.

"गोकुळा"त अतिक्रमण

"राजाराम"ची धाव तशी मध्यवस्ती, उपनगरापर्यंत... पण त्यांनी आपली हद्दपार करत "गोकुळा"तील कंदलगावात शिरकाव केला. तेथे रात्री गुपचूप छापाही टाकला, पण कारवाई पूर्वी अगर कारवाईनंतर शासकीय नजर असणाऱ्या "सीसीटीएनएस" वर त्याची नोंद न केल्याची चर्चा आहे, त्याचे परिणामही त्यांना लवकरच भोगावे लागणार, हे निश्चित!