शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

अभूतपूर्व रूपात सखींना भेटली लावणी

By admin | Updated: July 22, 2014 22:13 IST

‘कलाधाम ग्रुप’ने राजलक्ष्मी लॉन्सवर सादर केलेला हा कलाविष्कार सुमारे चार तास रंगला.

सातारा : कडाडत्या ढोलकीच्या तालावर रंगणारी लावणी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी. ‘नुपूरनाद’ या आगळ््यावेगळ्या कार्यक्रमातून ही लावणी फलटणच्या सखींना अभूतपूर्व रूपात भेटली. ‘कलाधाम ग्रुप’ने राजलक्ष्मी लॉन्सवर सादर केलेला हा कलाविष्कार सुमारे चार तास रंगला.शनिवारी (दि. १९) फलटणमधील सखींच्या भेटीला ही बहुरंगी लावणी आली, ती आजवर न भेटलेल्या रूपात. गण, गवळण, बतावणी आणि वग असा पारंपरिक बाज असला, तरी तो हाताळणाऱ्या सगळ््या महिला कलावंत होत्या. राजा-प्रधान या पारंपरिक पात्रांऐवजी मिसेस राजा आणि मिसेस प्रधान वगातून अवतरल्या. लावणीच्या परंपरेची माहिती देणारा हा कार्यक्रम मनोरंजक आणि बोधप्रद होता. लावणीच्या पूर्वेतिहासापासून आजच्या रूपापर्यंत सर्व काही सखींच्या पुढ्यात उभे राहिले.लावणीचा उगम संतवाड््.मयात आढळतो. नंतरच्या काळात कलगी-तुरा आणि अन्य रूपांत लावणी प्रकटत गेली. खुलत गेली. लावणीत प्रत्येक टप्प्यावर बदल होत गेले. पेशवाईत, नंतर ब्रिटिश काळात अनेक शाहिरांनी लावणी कशी खुलवली, याची माहिती रंजक स्वरूपात देण्यात आली.सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी सखींसमोर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात जयश्री आगवणे, सुनीता पाटील यांच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. यामध्ये मेहजबीन सय्यद या चंदूकाका सराफ यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या सुवर्ण नथीच्या मानकरी ठरल्या. सखी ब्यूटी पार्लरच्या वतीने भाग्यवान सखींना फेशियलची सुविधा मोफत देण्यात आली. (प्रतिनिधी)