शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बहिणींच्या आर्त हाकेला हात सरसावले

By admin | Updated: August 12, 2014 00:42 IST

‘लोकमत’च्या वृत्ताने हेरवाड येथील धामणे कुटुंबीयांना मदतीचा ओघ

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील मुक्या बहिणींनी भावासाठी ‘लोकमत’मधून मारलेली आर्त हाक समाजातील अनेक बंधूंच्या काळजापर्यंत पोहोचल्याने अनेकांचे हात मदतीसाठी सरसावले. रोख रक्कम, धान्य रूपातील मदतीसह दानशूर व्यक्तींनी धीर दिल्याने मुक्या बोलातच या बहिणी अश्रू ढाळत दातृत्वापुढे नतमस्तक होत आहेत.दारिद्र्याचे जीवन कंठत असलेले येथील जितेंद्र सर्जेराव धामणे यांचे आईवडिलांचे छत्र हरपल्याने दोन मुक्या बहिणींचा सांभाळ करीत असताना त्यांच्याही दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ते अंथरुणावर खिळून आहेत. याचे वास्तव लेखन रविवार (दि. १०) रोजीच्या अंकातून ‘अश्रू ढाळत मुक्या बहिणींची भावासाठी आर्त हाक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केल्याने समाजातील अनेकांचे हात या बहिणींच्या मदतीसाठी सरसावले. जिल्ह्याच्या विविध भागांतून ज्वारी, गहू, तांदूळ, तेल, साखर, कपडे यांसह रोख रक्कम दिली जात आहे. तसेच समाज या बहिणींना मानसिक आधार देत असल्याने या प्रेमाने धामणे परिवार भारावून जात आहे.या कुटुंबावर आपत्ती कोसळल्याने कार्यकर्ते बंडू पाटील, आप्पासो जोंधळे हे पालकत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मदतीसाठी सुकुमार पाटील (दानोळी), उद्योगपती पी. वाय. पाटील-टाकवडेकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र काळे, अबूबकर बारगीर, बाबासो काडाप्पा-पाटील, शकील शेख, संतोषकुमार पाटील, दिलीप पाटील (कागले), मारुती चौगुले, विश्वास बालिघाटे, बंडू पाटील यांच्यासह अनेकांनी रोख रकमेसह धान्य, कपडे रूपाने मदत करून मानवतेचे दर्शन घडविले आहे. नगरसेवकांचे असेही दातृत्वकोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ‘ईश्वर’ नामक ‘परमार’ व्यक्ती या कुटुंबासाठी धाऊनच आली. काल, रविवारी रात्री ते एकटेच आले. मला चार बहिणी असून ही पाचवी बहीण आहे. संकटाला धीराने तोंड देण्याचे व मी भाऊ म्हणून तुमच्याबरोबर आहे, असे सांगून उपचारासाठी त्यांनी दहा हजारांची मदत दिली. मात्र, फोटो काढण्यास नकार देऊन नावही प्रसिद्धीस त्यांनी विरोध केला.