शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा खून राजारामपुरीतील घटना : तीक्ष्ण हत्याराने भोसकले

By admin | Updated: May 14, 2014 01:03 IST

कोल्हापूर : आईला सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने सख्ख्या भावाचा भोसकून खून केल्याची घटना आज (मंगळवार) रात्री

कोल्हापूर : आईला सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून तीक्ष्ण हत्याराने सख्ख्या भावाचा भोसकून खून केल्याची घटना आज (मंगळवार) रात्री राजारामपुरी येथील शाहूनगर येथे घडली. अमित मनोहर कलकुटकी (वय २२, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली, शाहूनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेनंतर संशयित विकी मनोहर कलकुटकी (वय १९) पसार झाला. दरम्यान, हा प्रकार समजताच घटनास्थळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. जखमी अवस्थेत अमितला सीपीआर रुग्णालयामध्ये आणले. मात्र, तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अमित व विकी दोघे सख्ख्ये भाऊ असून शाहूनगर येथील नवशा मारुती मंदिराजवळ आईसमवेत राहतात. अमित हा आईला वरचेवर त्रास देत होता. यावरून दोघांच्यात वारंवार भांडणे होत असत. आज रात्री अमित घरी मित्रांसमवेत गप्पा मारत असताना अचानक तेथे विकी आला आणि त्याने थेट अमितच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी अमितच्या मित्रांनी विकीला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावरसुद्धा हल्ला करण्याचा विकीने प्रयत्न केला. त्यानंतर तेथून विकी पसार झाला. या प्रकाराची माहिती मित्रांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख सहकार्‍यांसमवेत आले. अमितला उपचारासाठी सीपीआरमध्ये नेले; परंतु तो उपचारापूर्वीच मृत झाला होता. अमित कलकुटकीचा खून झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. खुनाबाबत पोलीस माहिती घेत होते. या घटनेची नोंद रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)