उत्तूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे आजरा तालुक्यातील ३ कोविड सेंटरना पीपीई किट, फेसशिल्ड, हॅण्डग्लोव्हज् व मास्कचे वितरण करण्यात आले. तालुक्यातील मुकुंदराव आपटे कोविड सेंटर, मुमेवाडी, मुश्रीफ फाऊंडेशन कोविड सेंटर, उत्तूर व रोझरी कोविड सेंटर, आजरा यांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघाचे तालुका सहकार्यवाह दिगंबर यादव, श्रीपाद कुलकर्णी, विनायक चिटणीस, वामन आपटे, तुषार रावळ, करण शहापूरकर, किरण गंगापुरे, आदी उपस्थित होते.
--------------------------
२) लिंगनूरमध्ये वृक्षारोपण उत्साहात
गडहिंग्लज : लिंगनूर कानूल येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायतीतर्फे श्री भैरवनाथ मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच परमेश्वरी पाटील, संतोष पाटील, डॉ. शिवाजी मुगळी, बाळासाहेब पाटील, बी. टी. पाटील, बाळू चोथे, सहदेव घुगरे, श्रवण पाटील, दयानंद शिंदे, बसवराज पाटील, बापू गुरव, निंगोंडा पाटील, सतीश झिरले, संदीप पाटील, रावसाहेब पाटील, आदी उपस्थित होते.