गडहिंग्लज : ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार व त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी थकीत असल्यास संबंधित उमेदवार निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे छाननीपूर्वी थकबाकीदारांनी थकीत पाणीपट्टीची रक्कम भरावी आणि पाटबंधारे विभागाचे ना हरकत पत्र घ्यावे, असे आवाहन गडहिंग्लज व चंदगड पाटबंधारे उपविभागातर्फे करण्यात आले आहे.
------------------------
दुगूनवाडी ग्रामपंचायत चौथ्यांदा बिनविरोध
गडहिंग्लज : दुगूनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे चौथ्यांदा बिनविरोध झाली. या ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सदस्यांमध्ये विद्यमान सरपंच रोहिदास चौगुले, उपसरपंच शीतल पाटील, सदस्या शांता सुतार यांच्यासह रामदास पाटील, बड्याप्पा नाईक, सरिता नाईक व मंगल माटले यांचा समावेश आहे.
---------
कानडेवाडी ग्रामपंचायत बिनविरोधच्या वाटेवर
गडहिंग्लज : कानडेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे. या ग्रामपंचायतीच्या एकूण ७ जागांपैकी दोन जागांवर अनिता बंडू कुंभार व शुभांगी गोपाळ कांबळे हे बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित ५ जागांवर शुभांगी अजित देसाई, संचिता दयानंद देसाई, मोहन मारूती बेनाडीकर, प्रताप मनोहर देसाई व सुरेश बाळू कुंभार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.