महागाव : कोरोनामुळे सुमारे १० महिन्यांपासून बंद असलेला महागावचा दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार नववर्षाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाल्याने बाजार गर्दीने फुलला. हळूहळू स्थानिक व बाहेरगावचे व्यापारी बाजारासाठी हजेरी लावत आहेत.
----------------------
२) हिटणीचे उपसरपंच नंदगावी यांना पुरस्कार
नूल : हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील उपसरपंच बसवराज नंदगावी यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे. बेळगाव येथे २८ मार्च २०२१ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
* बसवराज नंदगावी : ०४०१२०२१-गड-०२
-------------------------
३) गडहिंग्लज बसस्थानकात एटीएम सुरू करा
गडहिंग्लज : गडहिंग्लज बसस्थानक परिसरात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एटीएमची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी यांनी आगारप्रमुख संजय चव्हाण यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात, गडहिंग्लज हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या बसस्थानकात आजरा, चंदगड, भुदरगडसह अन्य सीमाभागातील प्रवाशी, नोकरदार मंडळी कामानिमित्त गडहिंग्लजला येतात. त्यामुळे याठिकाणी एटीएम सुरू केल्यास प्रवाशांना अन्य एटीएम सेंटरकडे जाण्याचा त्रास थांबेल.
शिष्टमंडळात महादेव नाईक, राहुल गाताडे, अस्लम बेडसर, धनाजी शेटके, निकेतन चव्हाण, उदय पाटील, राजू कोरवी, संतोष कुरबेट्टी यांचा समावेश होता.