शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एकच पार्थिव; दोनवेळा अग्निसंस्कार!-- स्मशानभूमीच्या मरणयातना...

By admin | Updated: August 5, 2014 23:40 IST

पावसाळ्यातील चित्र : बोरखळमध्ये स्मशानभूमीअभावी उघड्यावर विधी

सुनील साबळे == शिवथर-- सातारा तालुक्यातील बोरखळ हे सुमारे चार हजार लोकवस्तीचे गाव. गावात अनेक सोयीसुविधा झाल्या; पण वैकुंठाकडे जाणारी वाट मात्र अद्याप होईना. गावात असलेल्या राजकीय गटबाजीमुळे स्मशानभूमी उभी राहू शकली नाही. यामुळे नदीकाठी उघड्यावर पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर ते वाहून गेल्याच्याही घटना घडल्या. तर काही वेळेला अर्धवट जळालेल्या मृतदेहाला दुसऱ्यांदा अग्नी देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीअभावी मृत्यूनंतरही मरणयातना सोसाव्या लागण्याचे दुर्दैव बोरखळकरांच्या नशिबी आले आहे.सातारा-लोणंद रस्त्यापासून चार किलोमीटर अंतरावर बोरखळ गाव आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात गावात कुणी मयत झाले तर कृष्णा नदीकाठी उघड्यावर अग्निसंस्कार केला जातो. निसरडा रस्ता, चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य यामधून वाट काढत पार्थिव कृष्णा नदीकाठी न्यायचे म्हणजे महाकठीण काम. स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा आहे. गावात दोन्ही गट एकाच पक्षाचे आहेत, मात्र स्मशानभूमीचा विषय निघाला की विरोधाला तोंड फुटते. मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाताना खराब रस्त्यामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होतात. दोन गटांत राजकीय हेवेदावे असल्यामुळे ग्रामपंचायतीत ठराव होऊनही काम होऊ न देण्याचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. जागा नसल्यामुळे स्वत:च्या कार्यक्षेत्रातही फंडाची रक्कम टाकता येत नव्हती, असे बोलले जायचे. मात्र, आता स्मशानभूमीसाठी गावातील काही जण आपली जमीन देण्यासही तयार असल्याने राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे. गावातील स्मशानभूमीचा प्रश्न प्रामुख्याने मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच स्मशानभूमीचे काम सुरू होणार असल्याने कित्येक वर्षांचा प्रश्न आता मिटणार आहे.- माधुरी रसाळ, सरपंचगावाला स्मशानभूमी नसल्यामुळे उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो. पावसाळ्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असतात. याचा गांभीर्याने विचार व्हावा.- तुकाराम ननावरे, ग्रामस्थजनसुविधा फंडातून बोरखळ गावच्या स्मशानभूमीसाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे.- सतीश चव्हाण, सदस्य, जिल्हा परिषद