शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

सिंधुदुर्गची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

By admin | Updated: September 6, 2015 20:57 IST

शालेय हॅण्डबॉल स्पर्धा : कोल्हापूर मनपा संघाची बाजी

बांदा : येथील खेमराज मेमोरियल प्रशाळेच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी १९ वर्षांखालील मुलींच्या गटात सिंधुदुर्ग संघाने विजय मिळवीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर मनपा, तर १९ वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर मनपा संघाने बाजी मारली.दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील २१ संघांनी सहभाग घेतला.१९ वर्षांखालील मुलींचा अंतिम सामना अत्यंत चरुशीचा झाला. या सामन्यात सिंधुदुर्ग संघाने कोल्हापूर मनपा संघावर ६ विरुद्ध ४ गोलनी विजय मिळविला. या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत कोल्हापूर मनपाने रत्नागिरी संघाचा ९ विरुद्ध 0 गोलने एकतर्फी पराभव केला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सिंधुदुर्ग संघाने कोल्हापूर जिल्हा संघाचा ७ विरुद्ध ३ गोलनी पराभव केला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने रत्नागिरी संघाचा ४ विरुद्ध १ गोलनी पराभव केला.१९ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूर मनपाने सांगली जिल्हा संघाचा २१ विरुद्ध १२ गोलनी पराभव केला. या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत सांगली जिल्हा संघाने सिंधुदुर्ग संघाचा १७ विरुध्द ९ गोलनी, तर सातारा संघाने कोल्हापूर मनपा संघाचा २३ विरुद्ध ८ गोलनी एकतर्फी पराभव केला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात सातारा संघाने सिंधुदुर्ग संघाचा ७ विरुद्ध ५ गोलनी पराभव केला.१७ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात कोल्हापूर मनपा संघाने कोल्हापूर जिल्हा संघाचा २0 विरुध्द ९ गोलनी पराभव केला. या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर जिल्हा संघाने सांगली जिल्हा संघाचा १0 विरुद्ध ३ गोलनी पराभव केला, तर दुसऱ्या उपांत्य लढतीत सांगली मनपा संघाने कोल्हापूर मनपा संघाचा १५ विरुद्ध ६ गोलनी पराभव केला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात सांगली जिल्हा संघाने सांगली मनपा संघावर सहज विजय मिळविला.स्पर्धेसाठी पंच म्हणून संदीप पाटील, प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे, राहुल तिवले, अमित कारेकर, प्रथमेश देवकर, संतोष पाटील, रणजित पाटील, आशिष पाटील, विवेक मिशाळ, सचिन पोवार, नीलेश साळोखे, नंदू नाईक, लक्ष्मण पावसकर, धुरी, रविदास शिरोडकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)