शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

साधेपणाने पण उत्साहात नाताळचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : दरवर्षी कॅरोल सिंगिगने नाताळचे स्वागत घरोघरी जाऊन केले जात होते. यंदा मात्र त्याला कोरोनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : दरवर्षी कॅरोल सिंगिगने नाताळचे स्वागत घरोघरी जाऊन केले जात होते. यंदा मात्र त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फाटा देण्यात आला आहे. त्यामुळे नाताळच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई, शुभेच्छा संदेश, ख्रिसमस ट्री ची सजावट, आकाश कंंदीलाचा प्रकाश, अशा उत्साही वातावरणात पण साधेपणाने गुरुवारी मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांनी नाताळ सणाचे स्वागत केले. प्रभू येशूंच्या जन्मदिनानिमित्त आज, शुक्रवारी सकाळपासून वायल्डर मेमोरियल चर्चसह सर्व चर्चमध्ये सहा सत्रांमध्ये इंग्रजी व मराठी उपासना होणार आहे.

ख्रिस्ती धर्मांमध्ये नाताळ सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी प्रभू येशूंचा जन्म झाल्याने त्यांचे स्वागत संपूर्ण घराची सजावट, विद्युत रोषणाईने रात्री बारा वाजता केक कापून केली जाते. आज, शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये रेव्हरंड डी. बी. समुद्रे हे भक्ती, तर रेव्हरंड जे. ए. हिरवे हे संदेश वाचन करणार आहेत. रेव्हरंड सिनाय काळे हे उपासना करणार असून याकरिता सेशन कमिटीचे सदस्यही उपस्थित राहणार घेणार आहेत. नऊ वाजून १५ मिनिटांनी कळंबा जेल येथे कैद्यांकरिताही विशेष उपासना केली जाणार आहे. त्यानंतर ९.४५, ११.१५ दुपारी १२.४५, दुपारी ३ अशा विविध सत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना सत्र आयोजित करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून शहरातील पापाची तिकटी, पानलाईन, महाद्वार रोड, राजारामपुरी, ताराबाई पार्क, आदी ठिकाणच्या बाजारपेठेत लहान, मोठ्या आकाराचे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लाॅजचे शर्ट, शुभेच्छापत्रे, सांताक्लाॅजची टोपी, कपडे, चाॅकलेटस अशाने बाजारपेठ फुलली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

आज, शुक्रवारी शहरातील खाईस्ट चर्च ब्रम्हपुरी उपासना मंदिर, रेसिडेन्सी क्लब शेजारील ऑल सेंट चर्च, सेव्हंथ डे चर्च, सेंट झेविअर्स चर्च, विक्रमनगरातील ख्रिस्ती समाज चर्च आदी चर्चमध्ये उपासना होणार आहे. शासनाच्या नव्या आदेशामुळे पुढील गुरुवारी (दि. ३१) नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारी वाॅच नाईट सर्व्हिस व प्रभूभोजन ही उपासना सायंकाळी सात वाजता होणार आहे, असेही वायल्डर मेमोरियल चर्चच्या सेशन कमिटीने जाहीर केले आहे.

साांताक्लाॅजची भेट

हा सण जरी ख्रिस्ती बांधवांचा असला तरी तो सर्वधर्मियांकडून साजरा केला जातो. त्यामुळे सणासाठी लागणारे ख्रिसमस ट्री, जिंगलबेल्स, चांदण्या, सांताक्लाॅजचे शर्ट, आदींची आवर्जून खरेदी केली जाते. लहान मुलांच्या उशाला अनेक पालक भेटवस्तू ठेवतात. सकाळी मुले उठल्यानंतर या भेटवस्तू पाहिल्यानंतर सांताक्लाॅजने भेटवस्तू दिल्याच्या आनंदात मुले आपला दिवस घालवतात.

फोटो : २४१२२०२०-कोल-ऑल सेंट चर्च

आेळी : ख्रिसमसनिमित्त गुरुवारी रात्री कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील ऑल सेंट चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)