शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यांत मराठा समाजाचे मूक आंदोलन : १६ जूनला कोल्हापुरातून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST

कोल्हापूर : समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्यांना देशातील पहिलं आरक्षण ज्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी दिले, त्या शाहू ...

कोल्हापूर : समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्यांना देशातील पहिलं आरक्षण ज्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी दिले, त्या शाहू भूमीतून म्हणजेच कोल्हापुरातून दि. १६ जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे रणशिंग फुंगले जाईल, अशी घोषणा करतानाच खासदार संभाजीराजे यांनी, मराठा समाजाने आतापर्यंत संयम दाखविला आता, आक्रमकपणा काय असतो तो दाखवू, अशा गर्भित इशाराही गुरुवारी दिला.

कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची एक बैठक पार पडली, त्यावेळी खासदार संभाजीराजे बोलत होते. कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही, कोल्हापुरातील संसर्ग तर राज्यातील सर्वांत जास्त असल्याने मोर्चाऐवजी प्रातिनिधिक आंदोलन करावे, अशी सूचना बैठकीत आल्यामुळे संभाजीराजे यांनी मोर्चाऐवजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक समाधी स्थळाजवळ मूक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.

सकल मराठा समाजाचे समन्वयकांबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी मूक आंदोलनात सहभागी व्हावे. आम्ही या आंदोलनात कोणीच बोलणार नाही; पण आमदार, खासदार, मंत्री यांनी येथे येऊन आपली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिक स्पष्ट करावी. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची नुसती पत्रे नकोत. तुम्ही तेथे या, भूमिका स्पष्ट करा. आरक्षण देण्याकरिता कशा पद्धतीची जबाबदारी घेणार ते ठोसपण सांगा, असेही आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केले.

कोल्हापुरातील आंदोलन झाल्यानंतर अशाच पद्धतीची मूक आंदोलने नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड जिल्ह्यात होतील, असे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. पाच जिल्ह्यांतील ही मूक आंदोलने सुरू असताना जर का या सरकारनी किंवा राज्यकर्त्यांनी आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर एकदाच जोर लावला जाईल. पुण्यातून थेट मंत्रालयावर लाॅंग मार्च काढला जाईल आणि त्यात संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा सहभागी होईल.

कोपार्डीत १२ जूनला अभिवादन-

सकल मराठा समाजाच्या आंदोलनात जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कोपार्डीतील समाधीला दि. १२ जून रोजी खासदार संभाजीराजे भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर मराठा समाजाच्या आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे.

मूक आंदोलनानंतर ‘लाॅगमार्च’ ची तारीख जाहीर करणार

पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड येथे मूक आंदोलने होतील. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात जायचे हे समन्वयक ठरवतील. पुढे प्रत्येक जिल्ह्याच्या समन्वयकांशी चर्चा करून लॉग मार्चची तारीख निश्चित केली जाईल. सगळ्या ३६ जिल्ह्यांतील मराठा समाजाला पुण्यात आणून तेथून हा थेट मंत्रायलावर लॉगमार्चची सुरुवात होईल, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.