शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोहिते, भोसले यांच्या मनोमीलनाचे संकेत

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

कार्यकर्त्यांमध्ये चर्चा : इस्लामपुरातील विवाह समारंभात आले एकत्र

बोरगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा सह. साखर कारखान्याच्या राजकारणातील नात्याने बंधू असलेले दोन धुरंधर योध्दे भविष्यकाळातील राजकारणात एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, इस्लामपूर येथील एका विवाह समारंभात या दोघांनी चक्क हस्तांदोलन करून चर्चा केली. हे पाहून येथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘कृष्णा’च्या भविष्यातील राजकाणातील मनोमीलनाची ही नांदी तर नसेल ना? अशीही चर्चा रंगली होती.प्रेमात, युध्दात आणि आता राजकारणात कोण कोणाचा शत्रू नाही, असा युक्तिवाद नव्याने निर्माण होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. कृष्णा सह. साखर कारखान्याचे राजकारण सांगली आणि सातारा जिल्ह्याला परिचित आहे. यात जुना यशवंतराव मोहिते गट विरुध्द जयवंतराव भोसले गट होता. तोच वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. इंद्रजित मोहिते व डॉ. सुरेश भोसले यांनीही चालवला आहे. या दोन गटांचा संघर्ष अनेकवेळा सभासद व कार्यकर्त्यांनी पाहिला व अनुभवला आहे. या दोन बंधूंमधून विस्तवही जात नव्हता. मात्र या दोघा बंधूंतील प्रेम इस्लामपूरमधील एम. डी. पवार मंगल कार्यालयात एका लग्नसोहळ्यात अुनभवण्यास मिळाले. प्रथम ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले या लग्नसमारंभास उपस्थित झाले. त्यानंतर काही वेळाने माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते हे कार्यक्रमस्थळी आले. या दोघांच्या आसनामध्ये बरेच अंतर होते. लग्न लागल्यानंतर हे दोघे बंधू एकत्रितपणे वधू—वरांना आशीर्वाद देण्यासाठी पुढे आले. यावेळी त्यांचे कार्यकर्तेही आमने—सामने आले. प्रत्येकाच्या नजरा उंचावल्या. एकमेकांचे पक्के शत्रू आता एकमेकांना बगल देऊन जाणार, असे वाटत होते. डॉ. सुरेश भोसले यांच्यासोबत कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील होते. जितेंद्र पाटील यांची चौकशी करुन, दोघांनी स्मितहास्य करुन हस्तांदोलन करून चर्चा केली. हे पाहिल्यानंतर उपस्थित हजारोजण आश्चर्यचकित झाले. भविष्यातील राजकारणात हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येऊन त्यांचे मनोमीलन होणार का? असेच प्रत्येकजण कुजबुजत होता. (वार्ताहर)राजकारण, समाजकारण व कौटुंबिक सोहळे यात कधीही आम्ही राजकारण आणत नाही. कोणीही असा गैरसमज करुन घेऊ नये. शेवटी आम्ही एकाच कुटुंबातील बंधू आहोत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी व कौटुंबिक हितसंबंध एका ठिकाणी, अशा स्वरुपाचे राजकारण आम्ही करत आलो आहे. भविष्यात काय घडेल हे आताच सांगू शकत नाही.डॉ. इंद्रजित मोहिते, माजी अध्यक्ष, य. मो. कृष्णा कारखाना.