कोल्हापूर : महापालिका निवडणूक वादातून शनिवार पेठेतील गवळ गल्लीतील तरुणावर गुरुवारी मध्यरात्री सिद्धार्थनगर येथील मैदानावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामध्ये कुमार कृष्णाजी ढवळे (वय ३७, रा. गवळ गल्ली, शनिवार पेठ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला फुलेवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, जखमी ढवळे याने अनोळखी तरुणांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दिली आहे. हे प्रकरण मिटविण्यासाठी दोन्ही गटांच्या प्रमुख नेतेमंडळींनी प्रयत्न केल्याने अदखलप्राप्त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थनगर मैदानावर शुक्रवारी मध्यरात्री कुमार ढवळे हा लघुशंकेसाठी गेला असता आठ ते दहा तरुणांनी पाठीमागून येऊन त्याच्यावर हल्ला केला. यावेळी त्याच्या पाठीत व पायावर चाकूने गंभीर वार करण्यात आले.
सिद्धार्थनगरात निवडणूक वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: November 7, 2015 00:14 IST