शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘सिद्धाळा गार्डन’ची लढत ‘बहुरंगी’

By admin | Updated: October 21, 2015 00:09 IST

नातेवाइकांच्या मतांवर भिस्त : कोण-कोणाची मते खाणार यावर विजयाचे गणित

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील ‘सिद्धाळा गार्डन’ या प्रभागात सणगर गल्ली तालीम, बोडके तालीम, डाकवे गल्ली, बजाप माने तालीम, जासूद गल्ली, गुलाब गल्ली, शाहू बँकेसमोरील काही भागांत गठ्ठा मतदान असल्याने हे भागच निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना चंद्रमोहन पाटील, भाजपकडून सुनंदा सुनील मोहिते, तर शिवसेनेकडून मंदा राजेंद्र पाटील व काँग्रेसच्या मयूरा राजू भोसले यांच्यातच खरी लढत आहे. हा प्रभाग पूर्वी रवी इंगवले आणि संभाजी देवणे यांच्या प्रभागात विखुरलेला होता. २००५ मध्ये या भागाचे नेतृत्व बाबा पार्टे यांनी केले होते. सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कल्पना पाटील यांचे पती चंद्रमोहन यांचा संबंध सणगर गल्ली, बोडके तालीम या परिसरात मोठा आहे. त्यात नातेवाइकांचा भरणा अधिक आहे. त्यामुळे पाटील यांना या निवडणुकीत अधिक पसंतीची शक्यता आहे. बाबा पार्टे यांच्या स्नुषाही या प्रभागातून इच्छुक होत्या. मात्र, त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली नाही. शिवसेनेकडून मंदा राजेंद्र पाटील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. गुलाब गल्ली, जासूद गल्ली येथील पाठिंब्यावर ताराराणी आघाडीकडून सुनंदा सुनील मोहिते याही रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून मयूरा राजू भोसले याही आपले नशीब आजमावत आहेत. अपक्ष म्हणून पार्टे यांच्या घराण्यातून श्रद्धा संतोष पार्टे आणि दुसऱ्या अपक्ष वैशाली गिरीष पाटील या रिंगणात आहेत. त्यांचे पती गिरीष ऊर्फ राजू हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणीची शक्यता आहे. या सहाही उमेदवारांनी प्रचारावर जोर देत यावेळी विजय मिळवायचा अशी खूण गाठ बांधली आहे. त्यातील कल्पना पाटील, सुनंदा मोहिते, मंदा पाटील यांनी प्रचारफेऱ्यांवर भर दिला आहे, तर श्रद्धा पार्टे, वैशाली पाटील, मयूरा पाटील यांनी आपल्या नातेवाइकांसह वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. ( प्रतिनिधी)लढत फक्त निवडणुकीपुरती...मंगळवार पेठ खऱ्या अर्थाने ‘फुटबॉलपटू घडविणारी खाण’ म्हणून सर्वपरिचित आहे. प्रत्येकाची घरे अगदी खेटून आणि जुन्या कोल्हापूरची आठवण करून देणारी घरे आणि एकमेकांमध्ये असलेल्या वर्षानुवर्षांच्या सलोख्याच्या संबंधांमुळे निवडणूक कोणतीही असो, त्यातील वाद हे तात्त्विक व केवळ निवडणुकीपुरते असतात. त्यामुळे एकमेकांविरोधात लढणारी मंडळी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्रित येतात, अशी ख्याती या भागाची आहे.