शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘शविआ’ची कॉँग्रेसवर कुरघोडी

By admin | Updated: November 9, 2015 23:39 IST

इचलकरंजी नगरपालिकेत कलगीतुरा : शहर विकास आघाडी अल्पसंख्य असूनही काँग्रेसला त्रासदायक

राजाराम पाटील -- इचलकरंजी  -बहुमत कॉँग्रेसचे, पण अल्पसंख्य असूनही पालिकेचा कारभार शहर विकास आघाडीकडे. अशी काहीशी विचित्र परिस्थिती इचलकरंजी नगरपालिकेची झाली आहे. त्यामुळे पालिकेची सभा बोलावणे आणि नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावरील प्रस्तावित अविश्वास ठराव यावरून ‘शविआ’ व कॉँग्रेसमध्ये शह-काटशहचे राजकारण रंगले आहे. आणि त्यानिमित्ताने दोन्ही पक्षाच्या प्रमुखांमध्ये होणारा कलगी-तुरासुद्धा रंजक ठरतो आहे.नगरपालिकेमध्ये असलेल्या ५७ नगरसेवकांपैकी २९ नगरसेवक कॉँग्रेसचे, ११ नगरसेवक राष्ट्रवादीचे आणि १७ नगरसेवक ‘शविआ’चे असे बलाबल आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी युती पालिकेत सत्तेवर आहे. या दोघांचे मिळून ४० आणि शहर विकास आघाडीचे १७ असे संख्याबळ दिसते आहे. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी राजीनामा दिला नाही आणि बंड केले. त्यांच्या या कृतीला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. तेव्हा कॉँग्रेसकडे बहुमत असले तरी नगराध्यक्षांवर अविश्वास आणण्यासाठी आवश्यक असलेला ४३ सदस्यांचा संच नसल्यामुळे बिरंजे यांच्यावर अविश्वास आणता आला नाही, अशा कोंडीत कॉँग्रेस पक्ष सापडला. त्यामुळे बिरंजे यांच्याबरोबर पालिकेच्या कामकाजात मिळते-जुळते घेणे कॉँग्रेसला भाग पडले.या घटनेला दहा महिने उलटले तरी शहर विकास आघाडी, पर्यायाने नगराध्यक्षा बिरंजे यांच्याकडून कॉँग्रेसच्या नगरसेवक-नगरसेविकांना सहकार्य मिळत नाही. त्यांच्या प्रभागातील विकासकामांना खीळ बसली आहे. अशा भूमिकेतून आता कॉँग्रेसने नगराध्यक्षांना अडचणीत आणण्याचे ठरविले आहे. त्याचीच एक खेळी म्हणून नगराध्यक्षांनी शनिवारी आयोजित केलेली विशेष सभा कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटाने अनुपस्थित राहून रद्द केली. त्यानिमित्ताने उभय पक्षाच्या पक्षप्रतोदांनी परस्परांवर आरोप केल्याने कलगी-तुरा रंगला आहे.‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव म्हणाले, कॉँग्रेसने व्हिप लागू करून सभा रद्द केली. म्हणजे नगरसेवकांवर कॉँग्रेसच्या श्रेष्ठींचा विश्वास नाही, असा स्पष्ट अर्थ निघतो. नगरसेवकांनीच नव्हे, तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी विश्वास गमाविला असल्याचा यातून राजकीय अर्थ निघतो आहे. त्याचवेळी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील म्हणाले, शहरामधील रस्ते आणि पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पाणी व रस्ते या कामांना प्राधान्य देण्याची गरज असल्याचे विषय कॉँग्रेसकडून नगराध्यक्षांना दिले. मात्र, त्यांच्या अध्यक्षीय दप्तरात पडून राहिले आहेत. याचा अर्थ नगराध्यक्षा कॉँग्रेसच्या असल्या तरी त्या कॉँग्रेस नगरसेवकांना डावलत आहेत, असे स्पष्ट होते. यावर नगराध्यक्षांनीसुद्धा पत्रकारांशी बोलताना मी कॉँग्रेसची असूनसुद्धा आपल्याला कोंडीत धरण्याचा प्रकार होत आहे आणि बिनबुडाचे आरोप कुणी करू नयेत. जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला. वर्मावर बोट आणि शह-काटशहाचे राजकारणनगरपालिकेमध्ये बहुमत असूनही कॉँग्रेसची झालेली गोची अािण त्याच्या वर्मावर बोट ठेवण्याची शहर विकास आघाडीकडून वारंवार होणारी खेळी यातून राजकीय शह-काटशह रंगणार, अशीच पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे. डिसेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या पोट समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतील राजकीय हालचालींना जसा वेग येत जाईल, तसे राजकारण अधिकच रंगत जाईल, असेही बोलले जाते.