शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळला ग्रामपंचायतींचे धुमशान

By admin | Updated: November 17, 2014 23:53 IST

३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका : राजकीय संदर्भ बदलणार

संदीप बावचे - शिरोळ --लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता शिरोळ तालुक्याला मे २०१५ मध्ये होणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मिनी विधानसभा म्हणून होणाऱ्या या ग्रामपंचायतींच्या नव्या प्रभाग रचनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. नेहमी गट-तट पातळीवर होणाऱ्या या निवडणुका विधानसभेनंतर कशा पद्धतीने होणार, या गटा-तटालाही राजकीय रंग कसा येणार, याची उत्सुकता आतापासूनच लागून राहिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका या चौरंगी झाल्या. जातीय समीकरणाचा चांगलाच रंग निवडणुकीत दिसून आला. मे २०१५ मध्ये शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, बस्तवाड, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, घोसरवाड, तेरवाड, बुबनाळ, मजरेवाडी, निमशिरगाव, उदगाव, तमदलगे, जैनापूर, शिरदवाड, गौरवाड, शिरटी, जुने दानवाड, कवठेगुलंद, हसूर, घालवाड, टाकळीवाडी, कुटवाड, अर्जुनवाड, चिपरी, नांदणी, यड्राव, धरणगुत्ती, कोंडिग्रे, कोथळी, दत्तवाड, जांभळी, दानोळी व शिरढोण अशा ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे रणांगण पेटणार आहे.निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मे २०१५ मध्ये ३३ ग्रामपंचायतींच्या मुदती संपणार असल्यामुळे प्रभाग रचनेचा आदेश येताच निवडणूक विभागातून त्याबाबत कार्यवाही सुरू होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण लागू केले आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींत निम्म्या जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुका या पक्षीय पातळीवर झाल्याने नेते जोमात अन् कार्यकर्ते कोमात अशी अवस्था झाली होती. ईर्ष्येचे राजकारण मोठ्याप्रमाणात दिसून आले. जिल्ह्यात शिरोळ तालुका राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. विधानसभेतील इतिहासानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही तालुका नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहेत.ग्रामपंचायतींच्या निवडणुका म्हटले की, स्थानिक गटा-तटाचे राजकारण पेटते. सध्या राजकीय समीकरणे तालुक्यात बदलल्यामुळे आगामी होणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय संदर्भ बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक गटा-तटांतर्गत विळ्या-भोपळ्याचे पाहायला मिळणारे राजकारण या निवडणुकीत कोणते वळण घेणार, याबाबतही उत्सुकता आहे. माजी आमदार सा. रे. पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, आदींची भूमिका व राजकीय डावपेच कशापद्धतीने आखले जातात, यावरच बरेच काही अवलंबून राहणार आहे. या निवडणुकीत आ. उल्हास पाटील यांच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच मिनी विधानसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. तत्पूर्वी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बॅँक व गोकुळ दूध संघ या निवडणुकांकडेही लक्ष लागून राहिले आहे.