शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळचा पूर वाढणार

By admin | Updated: August 8, 2016 00:37 IST

कोयना, वारणा धरणांतील विसर्गाचा परिणाम : अलमट्टी धरणातील पाण्याचे नियोजन सुरू

जयसिंगपूर : राधानगरी, वारणा व कोयना धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने शिरोळ तालुक्यातील कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. त्यातच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यात पूर परिस्थिती आणखी बिकट होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कोयना व अलमट्टी धरणातील पाण्याचे नियोजन साधले जात आहे. आठवडाभर झालेल्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत दुसऱ्यांदा झपाट्याने वाढ झाली. नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली गेली आहे. नृसिंहवाडी येथे दुसऱ्यांदा दक्षिणद्वार सोहळा झाला. गेल्या दोन दिवसांत पावसाने उसंत घेतली असली तरी राधानगरी, वारणा व कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. रविवारी कोयना धरणातून १७ हजार १११ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे, तर वारणा धरणातून १८ हजार तसेच राधानगरी धरणातून बावीशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूझाला आहे. यामुळे तालुक्यावर पुराच्या पाण्याचे संकट आणखीन वाढणार आहे. पाऊस कमी झाला असलातरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे येत्या दोन दिवसांत तालुक्यातील कृष्णेसह, दूधगंगा, पंचगंगा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. याचा परिणाम १२ आॅगस्टला होणाऱ्या कन्यागत महापर्वकालावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी सायंकाळी पाच वाजता उदगांव-अंकली पुलावर कृष्णेची पाणी पातळी ३९ फूट, कुरुंदवाड दिनकरराव यादव पुलाजवळ पंचगंगेची पाणी पातळी ५८ फूट, तर राजापूर बंधाऱ्यावर कृष्णेची पाणी पातळी ४५ फूट होती. अलमट्टीचा विसर्ग कमी कर्नाटकातील अलमट्टी धरणात शनिवारपर्यंत २ लाख ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, रविवारी तो विसर्ग कमी करून १ लाख ६२ हजार २३० ठेवण्यात आला. दरम्यान, कोयना व वारणा धरणांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. कन्यागतच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून योग्य ते नियोजन साधले जात आहे. मात्र, आलमट्टीचा विसर्ग वाढणे गरजेचे आहे. पुराचे पाणी वाढणार सांगली, सातारा व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच सातारा येथे बैठक झाली. या बैठकीत कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत सविस्तर चर्चा झाली. अलमट्टी धरणातील पाण्याबाबत नियोजन करण्याचे यावेळी ठरले असले तरी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. नृसिंहवाडीला पुराचा वेढा नृसिंहवाडी : नृसिंहवाडी परिसरात शनिवारपासून पावसाने उसंत घेतली असली तरी धरणक्षेत्रातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा-पंचगंगा नदीपात्रात गेल्या चोवीस तासांत चार फुटाने वाढ झाली आहे. पाणी वाढल्याने येथील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. रविवारी नृसिंहवाडी परिसरात पावसाने थोडी उघडीप दिली आहे. नृसिंहवाडी गावाच्या तीनही बाजूला नदी असल्याने पाण्याच्या पुराने गावाला वेढण्यास सुरुवात केली आहे. येथील बाबर प्लॉटमधील रामनगर येथील काही भागातील घरांत पाणी शिरल्याने लोक स्थलांतर करत आहे. वाढलेले पाणी देवसंस्थानचे अन्नछत्र, धार्मिक विधीगृह येथे शिरले असून प.प. टेंबे स्वामी महाराज नवे देवळाजवळ नदीचे पाणी आले आहे. दरम्यान, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणारा कन्यागत महापर्वकाल सोहळा व पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी एन.डी.आर.एफ.चे सेकंड कमांडंट वैरव नाथन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भेट देऊन पाहणी केली. इचलकरंजीत पंचगंगा इशारा पातळीवर इचलकरंजी : सलग दोन दिवस पावसाने उघडीप दिली असली तरी राधानगरी, चांदोली आणि कोयना धरणांतून पाणी सोडण्यात आल्यामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे नदीकाठच्या अकरा कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. यातील पाच कुटुंबे खासगी ठिकाणी, तर सहा कुटुंबांचे पूरग्रस्त छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. रविवारी दिवसभर अगदी तुरळक पाऊस पडला; मात्र धरणातून विसर्ग सुरू असल्याने दिवसभरात दीड फुटाने पाणी पातळी वाढून ६८ फुटांवर पोहोचली आहे. शहरातील ६८ फूट ही इशारा, तर ७१ फूट धोका पातळी प्रशासनाने निश्चित केली आहे.