शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांत वेतनावर श्रीपूजक नेमा

By admin | Updated: May 7, 2016 01:00 IST

‘देवस्थान’चा ठराव जुनाच : अंबाबाई, जोतिबा मंदिरांत कार्यवाहीच नाही

कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाई व वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिरात देवस्थानचे दैनंदिन कामकाज करणारे, पूजा करणारे व इतर विधी करणारे पुजारी व हक्कदार यांचे हक्क शासन व न्यायालय यांच्यामार्फत संपुष्टात आणून तिथे रोख रकमेच्या स्वरूपात वेतन देऊन पुजारी व सेवेकरी नेमण्यात यावेत, असा ठरावच या दोन्ही देवस्थानांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सर्वांनुमते मंजूर केला आहे. हा ठराव २६ फेब्रुवारी २०१४ रोजी करून तो पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविला आहे; परंतु शासनाकडून पुढे काहीच झाले नसल्याचे पुढे आले आहे.अंबाबाई मंदिरातील गाभारा प्रवेशाचा मुद्दा कोल्हापूरसह राज्यभरात गाजतो आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना गाभाऱ्यात श्रीपूजकांकडून मारहाण झाल्यावर नव्या वादाला तोंड फुटले. श्रीपूजकांनीही न्यायालयात दावा दाखल केला व जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना गाभारा प्रवेशासाठी एखाद्याला वेगळी वागणूक देता येत नाही, असे म्हणणे मांडले. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने व माजी नगरसेवक निशिकांत मेथे यांनी याच दाव्यात आपल्याला सहभागी करून घेण्याची विनंती करून श्रीपूजकांची परंपरेने चालत आलेली सेवा खंडित करून वेतनावर श्रीपूजक नियुक्त करण्याची मागणी केली; परंतु खुद्द देवस्थान समितीनेच तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने समितीचे अध्यक्ष असताना हा ठराव (क्रमांक ३९) मंजूर झाला आहे. त्याचे सूचक स्वत: माने असून प्रमोद पाटील अनुमोदक आहेत. असा आहे देवस्थान समितीचा ठराव क्रमांक ३९ ‘अंबाबाई व जोतिबा या दोन्ही देवस्थानांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर असून यापासून देवस्थान समितीस मिळणारा निधी व उत्पन्न मात्र अपुरे आहे. अलीकडील काही वर्षांत भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून देवाचे चरणी भक्तांकडून भरीव स्वरूपात रोख रक्कम व मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. देवस्थान समिती विश्वस्त म्हणून काम पाहते. त्यामुळे समितीस मिळणारा निधी हा सार्वजनिक असतो. या दोन्ही मंदिरांत पुजारी म्हणून काम करणारे भक्तांकडून मिळणाऱ्या देणग्या व निधीपैकी काही भाग प्रमुख हिस्सा म्हणून स्वीकारतात. हा निधी विश्वस्त निधीमध्ये जमा न होता तो संबंधित पुजारी व सेवेकरी यांची खासगी मिळकत होते. पंढरपूरसह काही देवस्थानांमध्ये अशा निधीच्या व्यवस्थापनासाठी न्यायालयानेच पुजारी तसेच सेवेकरी व इतर हक्कदार मंडळी यांना देणगी व भेटवस्तू घेण्यास प्रतिबंध केला आहे, तसाच निर्णय अंबाबाई व जोतिबा या देवस्थानांच्या बाबतीत व्हावा यासाठी हा ठराव मंजूर करण्यात येत आहे.