शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिंगनूरकरांचे जलयुक्तसाठी श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:57 IST

म्हाकवे : लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील तुळशीदास किल्लेदार सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून तरुणाईने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यासाठी गावच्या डोंगर उतारावर आणि वनिकरणात श्रमदान सुरु आहे. यामध्ये तरूणींसह महिलांचा सहभागही उल्लेखनीय आहे. तर, आता लोकवर्गणीतून जेसीबीच्या साहाय्याने हे काम जलदगतीने सुरू आहे.चिकोत्रा खोऱ्यातील शेवटचे ...

म्हाकवे : लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील तुळशीदास किल्लेदार सामाजिक फौंडेशनच्या माध्यमातून तरुणाईने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यासाठी गावच्या डोंगर उतारावर आणि वनिकरणात श्रमदान सुरु आहे. यामध्ये तरूणींसह महिलांचा सहभागही उल्लेखनीय आहे. तर, आता लोकवर्गणीतून जेसीबीच्या साहाय्याने हे काम जलदगतीने सुरू आहे.चिकोत्रा खोऱ्यातील शेवटचे टोक असणाºया या गावाला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे गावातील विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ व्हावी या उद्देशाने काही तरूणांनी गावच्या उत्तरेकडील वनीकरण परिसरात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्धार केला आणि चार दिवसांपूर्वी चार-सहा तरूणांनी खोरे, टिकाव, कुदळ, पाट्या हातात घेऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. सार्वजनिक मोकळ्या जागेत दोन ते तीन फूट खोल आठ ते दहा फूट लांब चरींची (सीसीटी) खुदाई सुरू केली. गावातील तरूण तरूणींसह महिलाही सहभागी झाल्या. पुढीलवर्षी लिंगनूर गाव पाणीदार होईल असा विश्वास या तरुणांनी व्यक्त केला आहे.सोशल मीडियाचा असाही वापरलिंगनूर गावातील तरूणांना व्हॉटस् अप ग्रुपच्या माध्यमातून या जलयुक्तच्या श्रमदानाबद्दल आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत ६५ हून अधिक तरुण व महिला श्रमदानासाठी पुढे आल्या. दररोज सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रमदान केले जात आहे. यामुळे सुमारे दोन लाख लिटर पाणी जमिनीत मुरले जाणार असून यामुळे गावातील विहीर, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.