शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आपणही माणसंच आहोत हे दाखवून द्या : बाबा आढाव

By admin | Updated: February 17, 2015 00:04 IST

कार्यकर्त्यांना हायसे

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ जेरबंद करण्यासाठी आज, मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चात आपणही माणसंच आहोत, हे हल्लेखोर प्रवृत्तीला दाखवून द्या. कोल्हापूरचे पोलीस हल्लेखोरांना लवकरच पकडून देतील, असा विश्वास ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी केला. पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बिंदू चौक येथे सोमवारी सायंकाळी आयोजित केलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. आढाव म्हणाले, मी बिंदू चौकातील सभेसाठी येत असताना एका पोलीस अधिकाऱ्याने मला एक विनंती केली की, बाबा, आम्हाला आता अन्य काही काम लावू नका. आम्हाला तपासावर लक्ष केंद्रित करायचे आहे. हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घ्यायचे आहे, अशी विनंती केली. त्यावर तुमचा तपास आम्हाला माहीत आहे. पुणे येथे डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचे काय झाले, असे मी म्हणालो. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने ‘बाबा, ते पुणे होते, हे कोल्हापूर आहे’, असे सांगितले. त्यामुळे लवकरच कोल्हापूर पोलीस हल्लेखोरांना पकडतील, असा विश्वास ठेवू. त्यांना संधी देऊ. कारण कोल्हापूरची माणसं हल्लेखोराला पकडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, हेही आपल्याला माहीत आहे. यावेळी ज्येष्ठ नेते भारत पाटणकर म्हणाले, हल्ला करणाऱ्या या भ्याड प्रवृत्तीवाद्यांनी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या लोकांची हल्ला करण्यासाठी जणू यादीच तयार करून हे हल्ले सुरू केले आहेत. येत्या चोवीस तासांत या हल्ल्यामागे सूत्रधार कोण आहेत, याचा छडा शासनाने लावला नाही, तर मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर लाखोंच्या संख्येने जमून जोपर्यंत हल्लेखोर प्रवृत्तींना अटक होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी माजी आमदार संपत पवार, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, बाबूराव गुरव, अतुल दिघे, गिरीश फोंडे, सीमा पाटील, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांना हायसे सायंकाळी साडेसात वाजता पानसरे अण्णांवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची व आयसीयूत शिफ्ट केल्याचे कार्यकर्त्यांना सभेदरम्यान समजताच त्यांना थोडे हायसे वाटले.