शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

प्रशासन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा

By admin | Updated: November 22, 2015 00:33 IST

इचलकरंजी नगरपालिका : इमारतीवर डिजिटल लावल्याचे प्रकरण

इचलकरंजी : येथील पालिकेच्या दवाखान्याकडील कर्मचारी राजू साहेब रजपुते यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने आयजीएम दवाखान्याच्या इमारतीवर डिजिटल फलक लावून पालिका इमारतीचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी दवाखान्याचे प्रशासन अधिकारी नितीन बनगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयजीएम दवाखान्याकडील कर्मचारी राजू रजपुते हे काल, शुक्रवारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते दवाखान्याच्या आवारातच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानिमित्ताने तयार केलेला डिजिटल फलक आयजीएम दवाखान्याच्या आवारात लावला होता. हा फलक लावताना पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पालिका इमारतीवर खासगी कार्यक्रमाचा फलक लावून विद्रुपीकरण झाले आहे. मात्र, हा फलक लावण्यास दवाखान्याच्या प्रशासन अधिकाऱ्यांनी मनाई करणे आवश्यक होते, म्हणून दवाखान्याचे प्रशासन अधिकारी बनगे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) शांतता क्षेत्रात स्पिकरही ४रजपुते यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आमदार हाळवणकर यांच्या हस्ते असताना या कार्यक्रमासाठी दवाखाना हे शांतता क्षेत्र असतानासुद्धा तेथे स्पिकर लावण्यात आला होता. या स्पिकरवरून काही नेतेमंडळींनी भाषणेसुद्धा केली. विशेष म्हणजे रजपुते यांच्या सुविद्य पत्नी रेखा रजपुते या नगरसेविका असल्यामुळेच या कार्यक्रमाला मोठे स्वरूप प्राप्त झाले असल्याची चर्चा दवाखान्याच्या परिसरात होती. ंआणखी चौघांना कारणे दाखवा नोटीस ४नगरपालिका प्रशासनाला खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी वॉर्ड निरीक्षक रवींद्र लोखंडे यांच्यासह चौघा कर्मचाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.