शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हुपरी ग्रामपंचायतीला ‘कारणे दाखवा’ नोटीस

By admin | Updated: September 17, 2014 00:09 IST

पोटकमिट्या बरखास्त प्रकरण: गटा-गटाच्या राजकारणाला वेगळे वळण

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या पोटकमिट्या बरखास्त करणे व नवीन निवडी करणे याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशास केराची टोपली दाखवत बेकायदेशीररीत्या खास सभेचे आयोजन केले. तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करून नवीन निवडी केल्या. या घडामोडीस जबाबदार धरून सरपंच सर्जेराव हांडे, ग्रामविकास अधिकारी ए. एस. वीरकर व विठ्ठल कांबळे यांना कारणे दाखवा नोटीस लागू केली असून, लेखी खुलासा करण्याचा आदेश गटविकास अधिकारी शबाना मुल्ला यांनी बजाविला आहे. सरपंच सुमन हांडे व ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ मुधाळे यांनी सत्ताधारी आवाडे गटाचा त्याग करून विरोधी शिवसेना-मनसे-राष्ट्रावादी कॉँग्रेसच्या तंबूत आश्रय घेतल्याने सत्ताधारी आवाडे अल्पमतात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी विरोधकांनी पोटकमिट्या बरखास्त करून नवीन निवडी करण्याचा राजकीय डाव खेळला. त्यासाठी १० सप्टेंबरला खास सभा घेतली. खास सभेस व पोटकमिट्या बरखास्त करण्यास विरोध करण्यासाठी आवाडे गटाने गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. खास सभेस कमिट्या बरखास्तीच्या विरोधकांच्या डावपेचाला शह देण्यासाठी आयोजित खास सभाच बेकायदेशीर असल्याचे पत्र ९ सप्टेंबरला मिळविले. या पत्राची दखलही न घेता सरपंच हांडे व ग्रामविकास अधिकारी वीरकर आणि कांबळे यांनी सभा घेऊन पोटकमिट्या बरखास्त करीत नवीन निवडीही जाहीर केल्या. त्यानंतर आवाडे गटाच्या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकारी शबाना मुल्ला यांनी सरपंचासह दोघा ग्रामविकास अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस लागू केली. याप्रकरणी लेखी खुलासा करण्याचा आदेश बजाविला आहे. सर्व काही अधिकारात : हांडेसरपंच सुमन हांडे यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामपंचायतीच्या पोटकमिट्या बरखास्त करणे व निवडी करणे या बाबी सरपंचांच्या अखत्यारीतील आहेत. सरपंचांच्या अधिकारांचा वापर करून खास सभा बोलावून कायदेशीररीत्याच कामकाज केले. गटविकास अधिकाऱ्यांनी बजाविलेला नोटिसीचा व लेखी खुलाशाचा अभ्यास करून उत्तर दिले जाणार आहे.