शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

'स्वाभिमानी'च्या सभासदांना फटका

By admin | Updated: October 28, 2014 00:18 IST

फरक बिलातील फरक :‘गोकुळ’च्या तुलनेत कमी दर, संस्थाचालकांमध्ये तीव्र नाराजी

कुरुंदवाड : स्वाभिमानी दूध संघाने यंदा ‘गोकुळ’पेक्षा कमी दूध फरक बिल दिले आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ला दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना सुमारे ३० लाखांचा फटका बसल्याने संस्थाचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, ‘गोकुळ’ने जाहीर केलेल्या दूध फरकाबरोबर दर देण्याची केलेली स्वाभिमानीची घोषणा यंदा हवेतच विरली आहे. त्यामुळे ‘पांढऱ्या दुधातील काळे बोके कोण’, असा सवाल दूध उत्पादक करीत आहेत.खासदार राजू शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून ऊस आंदोलन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक न्याय मिळवून देत आहेत. शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय असलेल्या दूध व्यवसायातही उत्पादकांची लूटमार होत असल्याने खा. शेट्टी यांनी सहा वर्षांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी निर्धार यात्रा काढली होती. यामध्ये दुधाला दर मिळाला पाहिजे, दिवाळी बोनस योग्य दिला पाहिजे, फॅटची मारामारी थांबविली पाहिजे, आदी प्रमुख मागण्या होत्या.दूध उत्पादकांना योग्य न्याय मिळवून द्यावा या उद्देशाने खा. शेट्टी यांनी २००९ ला खासगी स्वरूपात स्वाभिमानी दूध अ‍ॅग्रो प्रोडक्ट नावाखाली दूध संघाची निर्मिती केली. राजकारणविरहित संघ, योग्य नियोजन, काटकसर यामुळे स्वाभिमानी दूध संघ दूध उत्पादकांच्या विश्वासार्हतेला पात्र ठरला. त्यामुळे दररोजच्या संकलनाने पन्नास हजारांहून अधिक लिटरचा टप्पा ओलांडला. ‘गोकुळ’सारख्या इतर कपातींना फाटा देत स्वाभिमानीने दूध संकलन केंद्रांना दूध बिल देत वेगळ्या आदर्शाचा पायंडा घातला.‘गोकुळ’ दिवाळी बोनस जाहीर करताना केलेल्या रकमेत २० पैसे कपात करून डिंबेचर्स ठेव ठेवून घेतो. मात्र, स्वाभिमानीने गोकुळ जो दर जाहीर करेल, तितकीच रक्कम विनाकपात उत्पादकांना देण्याची परंपरा आजतागायत ठेवली होती.यंदा गोकुळ दूध संघाने दिवाळी बोनस म्हशीसाठी प्रतिलिटर एक रुपये ९५ पैसे, तर गाय दुधासाठी एक रुपये पाच पैसे जाहीर करून २० पैसे डिबेंचर्स कपात केली. मात्र, स्वाभिमानीने म्हैस दुधासाठी १.८०, तर गाय दुधासाठी ८५ पैसे प्रतिलिटर बोनस दिला आहे. त्यामुळे गोकुळने जाहीर केलेल्या दराप्रमाणे बोनस देण्याची परंपरा यावेळी स्वाभिमानीने मोडीत काढली. परिणामी स्वाभिमानीचे दररोज सरासरी ५० हजार लिटर संकलन गृहीत धरले असता प्रत्येक लिटरला साडेसतरा पैसे फरकानुसार सुमारे ३२ लाख रुपयांचा फटका दूध संकलन केंद्रांना पर्यायाने दूध उत्पादकांना बसला आहे.वास्तविक दूध संघ नफ्यात असतानाही असा निर्णय का घेतला गेला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ऊस उत्पादकांबरोबर दूध उत्पादकांना न्याय देण्याचा विचार करणाऱ्या खा. शेट्टी यांच्या या भूमिकेमुळे दूध उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.यंदाचा फरक असा....‘गोकुळ’चा दिवाळी बोनस स्वाभिमानीचा बोनस४ म्हैस दूध - १ रुपये ९५ पैसे (प्रतिलिटर)१ रुपये ८० पैसे४गाय दूध - १ रुपये ५ पैसे (प्रतिलिटर)८५ पैसे( गोकुळकडून२० पैसे डिबेंचर्स कपात )