शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘एक खिडकी’ योजनेला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 16:37 IST

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात सुरू केलेल्या ‘एक खिडकी’ योजनेला गणेश मंडळांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेली दोन दिवस याठिकाणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे दोनच पोलीस बसून होते. अन्य पोलीस ठाण्यासह महापालिका, महावितरण, प्रदूषण मंडळाचे कर्मचारीही फिरकले नाही. अखेर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर ...

ठळक मुद्देचार दिवसांत १२१ मंडळांची नोंदणी

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात सुरू केलेल्या ‘एक खिडकी’ योजनेला गणेश मंडळांकडून अल्प प्रतिसाद मिळत आहे. गेली दोन दिवस याठिकाणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे दोनच पोलीस बसून होते. अन्य पोलीस ठाण्यासह महापालिका, महावितरण, प्रदूषण मंडळाचे कर्मचारीही फिरकले नाही. अखेर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी दुपारपासून याठिकाणी कर्मचारी बसून राहिले. गेल्या चार दिवसांत १२१ मंडळांनी नोंदणी करून घेतली.

सार्वजनिक मंडळांना गणेश प्रतिष्ठापना, लाऊड स्पीकरचा वापर, मंडप परवाना, खड्डे परवाना तसेच विसर्जन मिरवणुकीचा परवाना घेणे बंधनकारक आहे. याकरिता त्यांना परवानगी मागणी अर्ज करावा लागतो. कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या कार्यालयांत भटकंती करावी लागते. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ‘एकाच छताखाली सर्व परवाने’ मिळण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे. पोलीस, महापालिका, महावितरण व प्रदूषण मंडळ येथील कर्मचारी याठिकाणी बसून आहेत. मंडळांना धर्मादाय आयुक्तालयाकडून परवानगी मिळाली आहे का, याची पाहणी करून पुढील परवाने दिले जातात. ही ‘एक खिडकी योजना’ सुरू करुन तीन दिवस झाले आहेत.

गेली दोन दिवस लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी याठिकाणी बसून होते. अन्य राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी पोलीस ठाण्यांसह महापालिका व ‘महावितरण’चे कर्मचारी फिरकलेच नाहीत. त्याचबरोबर मंडळांचाही गतवर्षीपेक्षा प्रतिसाद कमी दिसून आला. डॉ. अमृतकर यांनी उपस्थित कर्मचाºयांकडून माहिती घेत महापालिका, महावितरण व अन्य पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांकडे पाठपुरावा केल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर सर्व कर्मचारी उपस्थित राहिले.