शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जाचक अटींमुळे अपघात विमा योजनेस अल्प प्रतिसाद

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

चंदगड तालुक्यातील स्थिती : ५ वर्षांत अवघे ४१ लाभार्थी, अटी शिथिल करण्याची मागणी

नंदकुमार ढेरे -चंदगड -नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाकडून संबंधित कुटुंबाला शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत १ लाख रुपयांची मदत दिली जाते. पण, या योजनेतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू व अन्य काही अटींमुळे गेल्या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ जणांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाती मृत्यू किंवा दोन अवयव निकामी झाले, तर लाख रुपयांची मदत मिळते. एक अवयव निकामी झाला, तर ५० हजार रुपये मिळतात. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय १० ते ७५ वर्षे या दरम्यान असण्याची अट आहे. त्याचबरोबर प्रस्तावासोबत अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे नाव ७/१२ वर आले, तर त्या संबंधी फेरफार नोंद (गाव नमुना नं. ६-ड), पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आदी कागदपत्रे जोडून प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयास सादर करावा लागतो. कृषी कार्यालय तो विमा कंपनीस पाठवते. त्यानंतर योजनेचा लाभ विमा कंपनी देते.७/१२ पत्रकावर कुटुंबातील वडीलधारी म्हणजेच कर्त्या व्यक्तीचे नाव असते. परंतु प्रत्यक्षात शासनाने कर्ती म्हणून संबोधलेली व्यक्ती वयोमानानुसार तसेच आजारपण वगैरे अन्य कारणाने खऱ्या अर्थाने कर्ती असतेच असे नाही. तसेच वडीलधारी व्यक्ती हयात असल्याने कुटुंबातील अन्य कर्त्या व्यक्तींची नावे (मुलांची) ७/१२ पत्रकी नोंद नसतात. पण बऱ्याच कुटुंबाचा भार या मुलांवर अवलंबून असतो. दुर्दैवाने कुटुंब चालवणाऱ्या कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यास संबंधिताचे नाव ७/१२ पत्रकी नसल्याने शासनाच्या नियमानुसार या कुटुंबाला मदतीची रक्कम मिळत नाही.त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली अनेक कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. याच जाचक अटीमुळे २००८-०९ त २०१४-१५ या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.२०१४-१५ मध्ये कृषी कार्यालयास चार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात कुटुंबातील कर्त्या पण ७/१२ पत्रकी खातेदार म्हणून नावाची नोंद नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर संबंधित कुटुंबाला या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शासनाला जर खऱ्या अर्थाने शेतकरी जनता अपघात योजनेचा लाभ अडचणीतील शेतकरी कुटुंबाला द्यायचा असेल, तर या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वच पातळीवर उठाव होण्याची गरज आहे.