शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

राज्याचा निर्णय होईपर्यंत दुकाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

कोल्हापूर : दुकाने सुरू करण्यासंबंधात व्यापाऱ्यांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. हा विषय राज्यस्तरीय ...

कोल्हापूर : दुकाने सुरू करण्यासंबंधात व्यापाऱ्यांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली आहे. हा विषय राज्यस्तरीय असून दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत व्यावसायिकांनी बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. आज शुक्रवारी काही निर्णय न झाल्यास याबाबत सोमवारीच काही निर्णय अपेक्षित आहे. शनिवार-रविवारी वीकेंन्ड लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार बंद राहणार आहेत.

‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य शासनाने सरसकट सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याला व्यावसायिकांनी तीव्र निषेध केला असून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. राज्यभरातून होत असलेला विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तसेच संलग्न संस्थांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. सरकार व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही, सकारात्मक निर्णय घेऊ, दोन दिवसांचा वेळ द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दुपारी व्यावसायिकांशी व्हीसीद्वारे संवाद साधला.

यावेळी व्यावसायिकांनी गुढीपाडवा जवळ आला आहे. आधीच वर्षभर कोरोनामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यात आता पुन्हा लॉकडाऊन झेपण्यासारखे नाही. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळू; पण व्यवसायाची परवानगी द्या, अशी मागणी केली.

त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय राज्य पातळीवर घेतला जाणार असल्याने मुख्यमंत्र्यांचा निर्णय होईपर्यंत थांबा, त्यांनी दिलेल्या शब्दाचा मान राखा, असे आवाहन केले. या चर्चेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, नाभिक संघटनेचे अध्यक्ष सयाजी झुंजार, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, ज्येष्ठ व्यापारी प्रदीपभाई कापडिया, हॉटेल कामगार संघटनेचे गिरीश फोंडे यांनी सहभाग घेतला.

---

नियमावली शासनाला सादर

व्यवसाय सुरू करताना कोणकोणते नियम पाळले पाहिजेत, यावर राज्य शासनाने व्यावसायिकांकडे मार्गदर्शक नियमावली मागितली आहे. ही नियमावली राज्य संघटनेने सादर केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.

--