शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून सरसकट दुकाने सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:19 IST

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या खाली आल्यामुळे सरसकट सर्वच दुकाने सोमवारपासून सुरु होण्याचा मार्ग ...

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या खाली आल्यामुळे सरसकट सर्वच दुकाने सोमवारपासून सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच कोल्हापूर जिल्हा आता स्तर ३ वर आला असल्याचे सांगत परवानगी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी तसेच छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यातून होत होती. प्रायोगिक तत्वावर मागच्या आठवड्यात तशी परवानगीही देण्यात आली. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी काही कमी होत नसल्यामुळे सोमवारपासून पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी होती.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली आणि निवेदन देऊन सरसकट सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी केली. त्यावेळी त्याचठिकाणी उपस्थित असलेल्या महानगरपालिका प्रशासक डॉ. कादबंरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे आरोग्य मंत्र्यांनी विचारणा केली. तेव्हा प्रशासक बलकवडे यांनी सांगितले की, कालच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अहवाल आला असून, जिल्ह्याची कोरोनाबाधितांची टक्केवारी दहाच्या खाली आल्याचे म्हटले आहे.

जिल्ह्यातील बाधितांची टक्केवारी दहाच्या खाली आली असेल तर मग सोमवारपासून सर्वच दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. व्यापाऱ्यांनी काळजी करु नये, कोल्हापूरचा समावेश स्तर ३ मध्ये होणार आहे, असे पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, सतीश माने, शाम बासरानी, अनिल पिंजानी, दर्शन गांधी, विपुल पारेख, माणिक पाटील चुयेकर, प्रताप पवार, किरण नकाते, जयंत गोयानी, मनोज बहिरशेठ, शाम जोशी, आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

जनता बझार चौकात सभा -

जनता बाजार चौक येथे राजारामपुरीतील व्यापार्‍यांची सभा झाली. यावेळी सोमवारपासून सर्व व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ललित गांधी यांनी सभेत सांगितली. आतापर्यंतच्या लढ्याची तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीची माहिती देऊन आरोग्यमंत्र्यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचे आदेश देण्याचे मान्य केल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रमुख व महापालिका आयुक्त यांनीसुद्धा सकारात्मक अहवाल देऊन व्यापाऱ्यांच्या मागणीला पाठबळ दिल्याचे गांधी यांनी सांगितले.

(फोटो देत आहे)