शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर दुकानदारांनी अतिक्रमण हटवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आवारातील पूजा साहित्याची दुकाने, स्टॉल यांनी केलेले वाढीव अतिक्रमण हटविण्याची सूचना मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. याशिवाय प्लास्टिकमुक्त नवरात्रौत्सव साजरा करताना भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. दुसरीकडे, मुख्य दर्शन रांगेसाठी पूर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आवारातील पूजा साहित्याची दुकाने, स्टॉल यांनी केलेले वाढीव अतिक्रमण हटविण्याची सूचना मंगळवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. याशिवाय प्लास्टिकमुक्त नवरात्रौत्सव साजरा करताना भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. दुसरीकडे, मुख्य दर्शन रांगेसाठी पूर्व दरवाजा येथे दर्शन मंडप उभारणी सुरू करण्यात आली.शारदीय नवरात्रौत्सवाला आता दहा दिवस उरले आहेत. त्यानिमित्त सर्वत्र तयारीची लगबग सुरू आहे. करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरामध्येही जय्यत तयारी सुरू असून मंदिराची स्वच्छता, शिखरांची रंगरंगोटी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष, खजिनदार वैशाली क्षीरसागर यांच्यासह समिती सदस्यांनी मंदिराच्या अंतर्बाह्य परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर आवारात प्लास्टिक पिशव्या बंदीचा निर्णय घेतला; तसेच दुकानदारांनी प्लास्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत, भाविकांनी पिशव्या मागितल्यास नकार द्यावा. तसेच आवारातील अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही केल्या. मुखदर्शन, अन्नछत्र, दर्शनरांग यावर समिती सदस्यांनी चर्चा केली. येत्या आठवड्यात घेण्यात येणाºया बैठकीमध्ये अन्य प्रलंबित गोष्टींवर निर्णय घेण्याचे निश्चित केले.महाप्रसादसंयुक्त विद्यमानेअंबाबाईच्या नवरात्रौत्सवाची सांगता पौर्णिमेच्या महाप्रसादाने होते. यासंबंधी गेल्या काही वर्षांपासून देवस्थान समिती व महालक्ष्मी भक्त मंडळामध्ये न्यायालयात दावा सुरू होता. न्यायालयाने भक्त मंडळ, देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचे आयोजन केले जावे, असा निर्णय दिला आहे.