शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

चित्रनगरीला ‘शूटिंग’ची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:04 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भारतातील पहिला बोलपट, पहिला सामाजिक चित्रपट, पहिला सुपरस्टार, भारतीय बनावटीचा पहिला ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भारतातील पहिला बोलपट, पहिला सामाजिक चित्रपट, पहिला सुपरस्टार, भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, पोस्टर पेंटिंग अशा अगणित विक्रमांतून मराठीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ देणाऱ्या कोल्हापूरचे भविष्य आता मात्र अंधारात आहे.येथील चित्रपटसृष्टी संपल्यात जमा आहे; तर आशेचा किरण असलेल्या सुसज्ज चित्रनगरीला वर्ष लोटले तरी तिच्यासंबंधी दूरदृष्टी आणि विकासात्मक धोरणाचा अभाव असल्याने चित्रपट व्यावसायिकांनी तिच्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरच्या चित्रपट परंपरेचे आणि इतिहासाचे गोडवे गाण्यापलीकडे कोल्हापूरकरांच्या हाती काही नसल्याचे निराशाजनक चित्र आहे.कोल्हापूर म्हणजे कलेचे माहेरघर. राजाश्रयामुळे येथे चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य, संगीत अशा सगळ्या कला बहरल्या. भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ देणारी बीजे रोवली गेली ती कोल्हापुरात. आज देशात मुंबई, हैदराबादसारखी शहरे चित्रपटनिर्मितीचे मुख्य केंद्र बनली असली तरी एकेकाळी कोल्हापूर अव्वल स्थानी होते. मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर, दिलीपकुमार यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या मातीत अभिनयाचे धडे घेतले. कलामहर्षी बाबूराव पेंटरांपासून सुरू झालेली ही परंपरा पुढे भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, अनंत मानेंपर्यंत झिरपत आली. मध्यंतरीचा काळ जसा मराठी चित्रपटसृष्टीसाठी खडतर होता, तसाच तो कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायासाठीही होता.त्याला नवी उभारी देण्यासाठी ‘कोल्हापूर चित्रनगरी’ची मागणी पुढे आली. शालिनी सिनेटोन आणि ‘जयप्रभा’मध्येच चित्रनगरी सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर कोल्हापुरातील मोरेवाडीच्या ७७ एकर विस्तीर्ण माळरानावर २५ सप्टेंबर १९८४ रोजी कोल्हापूर चित्रनगरीचा नारळ फुटला. त्यासाठी दिग्दर्शक अनंत माने, द. स. अंबपकर, चंद्रकांत, सूर्यकांत, आय. बारगीर, सुभाष भुरके, वसंत शिंदे व शंकर सावेकर यांनी पुढाकार घेतला होता. सुरुवातीची काही वर्षे चित्रनगरीत मोठ्या प्रमाणात चित्रीकरण झाले. मात्र, शासकीय उदासीनतेतून यंत्रसामग्रीच्या अभावाने येथील चित्रपट निर्मिती रोडावली. पुढे शासनाने तोट्यात चाललेली महामंडळे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यात चित्रनगरीचाही समावेश होता. मात्र, कोल्हापूरकरांनी उभारलेल्या जनआंदोलनाने शासनाला हा निर्णय बदलण्यास भाग पाडले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चित्रनगरीचे पुनरुज्जीवन करणार असल्याचे जाहीर केले. हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही चित्रनगरीला मोडकळीस आलेली इमारत, वटवाघळांचा मुक्त संचार, जाळी-जळमटे अशा अवस्थेत एक तप काढावे लागले. अखेर २०१२ साली शासनाच्या वतीने चित्रनगरीचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले आणि विकास आराखडा तयार झाला.कागदावरील हा आराखडा वास्तवात उतरण्यासाठी २०१६ साल उजाडले आणि पहिल्या टप्प्यातील १२ कोटींच्या विकासकामांना सुरुवात झाली. अनेक वर्षांचा वनवास, लाल फितीचे चटके आणि असंख्य अडचणी पार करीत कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या विकासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. डिसेंबर २०१७ मध्ये या चित्रनगरीचे उद्घाटन होणार होते; पण अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही.पुढील टप्प्यासाठी १६ कोटीचित्रनगरीच्या पहिल्या टप्प्यात चित्रीकरण तातडीने सुरू होण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून शासनाला उत्पन्न सुरू झाले की, दुसरा टप्प्याच्या १६ कोटींच्या आराखड्याचे काम सुरू करण्याचे नियोजन होते. यात हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लागणारा मोठा स्टुडिओ उभारण्यात येणार आहे. त्याला नऊ कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे. याशिवाय परिसरातील अन्य रस्ते व खास चित्रीकरणासाठी उपयुक्त असतील अशी १५ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण झाडे लावण्यात येणार आहेत; पण पहिला टप्पा संपून वर्ष झाले तरी येथे चित्रीकरणच सुरू झालेले नाही. त्यामुळे दुसºया टप्प्याचा विचार अजून नजरेच्या टप्प्यात नाहीच.अवास्तव दर, व्यावसायिकतेचा अभावचित्रनगरीच्या पुनरुज्जीवनानंतर येथील लोकेशन्सचे दर मराठी चित्रपट व्यावसायिकांना परवडणारे असतील असे सांगण्यात आले होते; पण झाले उलटेच. व्यवस्थापनाने प्रत्येक लोकेशनला एका दिवसासाठी आकारलेले अवास्तव भाडे पाहता वर्षानंतरही येथे चित्रपटांचे शूटिंग का होत नाही, याचे कारण समजेल. सध्या मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीसह अन्य स्टुडिओंमध्ये हिंदी, मराठीसह चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होते. कन्नड, दाक्षिणात्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती होते. त्याला उत्तम पर्याय म्हणून चित्रनगरीकडे पाहिले जात होते. कोल्हापुरात चांगला स्टुडिओ आहे, याची हिंदीच काय; मराठीतील चित्रपट-मालिका निर्मात्यांनाही माहिती नाही. चित्रनगरीची प्रसिद्धीच करण्यात आलेली नाही. हिंदी-मराठी चित्रपट, मालिकांच्या प्रॉडक्शन हाऊसपर्यंत पोहोचलेले नाही. त्यांना येथे चित्रीकरणासाठी प्रोत्साहित केलेले नाही.नव्या पिढीची धडपडएकीकडे कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची दुरवस्था होत असताना दुसरीकडे तरुणाईची धडपड आणि त्यांना मिळत असलेले यश ही सकारात्मक बाब आहे. येथील मातीत तयार झालेले चित्रपट, लघुपट विविध महोत्सवांत गाजत आहेत. अनेक कलाकारांनी चित्रपट, मालिकांमधून आपले स्थान पटकाविले आहे. ग्रामीण भागातील कलाकार, आपापल्या संकल्पना घेऊन या क्षेत्रात उतरत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी चित्रपट महामंडळासह या क्षेत्राशी संबंधित संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘जयप्रभा’चे काय करणार ?चित्रपटसृष्टीला उभारी देण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी जयप्रभा स्टुडिओ उभारला. त्यानंतरच्या सरकारनेही भालजींना ‘परिसराचा वापर केवळ चित्रपटासाठीच केला जावा,’ असा करार करून हा स्टुडिओ विकला. या स्टुडिओत भालजींनी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिला; पण भालजी अडचणीत आल्यानंतर त्यांनी हा स्टुडिओ आणि परिसरातील जागा गायिका लता मंगेशकर यांना विकली. मध्यंतरीच्या काळात स्टुडिओ बंद पडला आणि मराठी चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली. परिणामी, जयप्रभा स्टुडिओचीही वाताहत झाली. लता मंगेशकर यांनी सुरुवातीला मोकळी जागा विकली; पण प्रत्यक्ष स्टुडिओ विक्रीचा घाट घातल्यानंतर कोल्हापूरकरांनी २०१३ साली आंदोलन केले. दरम्यान, महापालिकेने जयप्रभा स्टुडिओचा समावेश हेरिटेज वास्तूंच्या यादीत केल्याने हा स्टुडिओ बचावला आहे.काही दिवसांपूर्वीच ‘हेरिटेज’विरोधातील याचिका लता मंगेशकर यांनी सर्वोच्च न्यायालयातून काढून घेतली. स्टुडिओ वाचला तरी त्याचे पुढे काय हा प्रश्न उरतोच. रया गेलेल्या इमारती आणि तुटलेले गेट एवढीच काय ती स्टुडिओची संपत्ती! चित्रीकरणाचे साहित्य पूर्वीच हलविले गेले आहे. शिवाय स्टुडिओ हेरिटेज यादीत असला तरी त्याची मालकी लता मंगेशकर यांचीच आहे. शासनाने सध्या चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित केल्याने पुन्हा जयप्रभा स्टुडिओसाठी निधी मिळणे शक्य नाही. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जयप्रभा स्टुडिओचे करणार काय, हा प्रश्न आहे.चित्रपट संग्रहालय हवेचकोल्हापूरला चित्रपटसृष्टीची १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. हा उज्ज्वल इतिहास सगळ्यांना केवळ माहिती आहे; पण त्याची साक्ष देणारे एकही चित्रपट संग्रहालय कोल्हापुरात नाही. अजूनही येथील जुन्या-जाणत्या कलाकारांकडे, चित्रपट व्यावसायिकांकडे तसेच चित्रपट महामंडळाकडे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यापासूनची छायाचित्रे, कृष्णधवल चित्रपट, त्या काळी चित्रीकरणात झालेले प्रयोग, लहान-मोठ्या फिल्म्सचा खजिना उपलब्ध आहे. या सगळ्यांचे संकलन तसेच दिवंगत चित्रपट व्यावसायिकांची माहिती, त्यांनी निर्माण केलेले चित्रपट, येथील मातीत घडलेले कलाकार, त्यांची छायाचित्रे चित्रपट संग्रहालयात ठेवल्यास कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास जगाला कळेल. आता ‘शालिनी’चे अस्तित्व संपले; पण ‘जयप्रभा’मधील स्टुडिओचे स्ट्रक्चर अजूनही आहे. या इमारतीचेच नूतनीकरण करून तेथे चित्रपट संग्रहालय उभारणे सहज शक्य आहे.अजूनही वेळ गेली नाहीआता कोल्हापुरातून चित्रपट निर्माण होत नसले तरी त्यासाठी व मालिकांसाठीचे लोकेशन्स, सहकलाकार, तंत्रज्ञ, नृत्य-कलादिग्दर्शक, लेखक, सहदिग्दर्शक अशी कॅमेºयामागचे जग सांभाळणारी भक्कम फळी येथे आहे. शहराच्या बाह्य परिसरात, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चित्रीकरण होते. त्यामुळे स्थानिक चित्रपट व्यावसायिकांनाही रोजगार मिळाला आहे. अजूनही या क्षेत्रात खूप काही करण्यासारखे आहे. त्यासाठी स्थानिक चित्रपट व्यावसायिकांनीही थोडा पुढाकार घ्यायला हवा.शिल्पं गेली अडगळीतकोल्हापूरला लाभलेल्या चित्रपट परंपरेच्या खाणाखुणा सांगणारी ‘प्रभात’ची तुतारी, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या कॅमेºयाचे शिल्प, त्यांचा पुतळा, जी. कांबळेंचे संग्रहालय हा सगळा ठेवा आता अडगळीत गेला आहे. पर्यटकांनी ही शिल्पे पाहण्यासाठी यावे या दृष्टीने त्यांचे सुशोभीकरण झालेले