शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शॉटकट मार्गामुळे बॉक्साईट वाहतूक झाली अडचणीची

By admin | Updated: May 27, 2014 19:37 IST

कसबा तारळेतील ग्रामस्थ संतप्त : आंदोलनाचा इशारा

कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील हिंडाल्को माईन्स येथून बॉक्साईटची वाहतूक करणार्‍या अनेक ट्रकची कसबा तारळे, गुडाळ, खिंडी-व्हरवडे गावांतून वर्दळ सुरू आहे. या मार्गावर लहान-मोठे अपघातही घडले आहेत. या संदर्भात कंपनीच्या अधिकार्‍यांना सांगूनही वाहतूक मार्गात बदल झालेला नाही. याबाबत कंपनीने तत्काळ दखल न घेतल्यास ‘रास्ता रोको’चा इशारा धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी दिला आहे. दुर्गमानवाड पैकी पडसाळी येथून हिंडाल्को कंपनीची बॉक्साईट वाहतूक बेळगाव येथे सुरू आहे. यासाठी दिवसभरात २५० ते ३०० ट्रक वाहतूक करीत आहेत. ही वाहतूक माईन्सपासून दुर्गमानवाड, पिरळ, राधानगरी, गैबी तिट्टा, सरवडे, निपाणीमार्गे बेळगाव अशी सुरू आहे. परंतु वाहतूक करणारे शंभरच्या वर ट्रक अंतर व वेळ वाचविण्यासाठी कसबा तारळे, गुडाळ, खिंडी व्हरवडेमार्गे अकनूर, मुधाळ तिट्टा या गावांतून वाहतूक करीत आहेत. यातील अनेक ट्रक हे वरील गावातील आहेत; त्यामुळे गावातून जाण्यासाठी किंवा वेळ व अंतर वाचविण्याच्या उद्देशाने ते वाहतूक करीत आहेत. गावातील रस्ते अरुंद असून रहदारी जास्त आहे. त्यात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातही झालेले आहेत. ग्रामस्थांनी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु स्थानिक ट्रकचालक किंवा मालकांनी याची दखल घेतली नसल्याने वादावादीचे प्रसंगही घडले आहेत. कंपनीचे कर्मचारीही वाहतूक मार्गावर जाणार्‍या-येणार्‍या ट्रकचे नंबर नोंद करून घेत आहेत; पण त्यावरही काही मर्यादा येत आहेत. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही लेखी निवेदन देण्यात आले आहे. यानंतर वाहतूक एक-दोन दिवस सुरळीत होते. परत ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे होत आहे.