शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेला बंडखोरीची लागण

By admin | Updated: October 4, 2015 00:37 IST

निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप : ‘तटाकडील’मधून राजू जाधव अपक्ष

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी तटाकडील प्रभागातून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी डावलल्याने शिवसेना रिक्षाचालक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले, तर दुधाळी प्रभागातूनही शिवसेनेचे दुधाळी शाखाप्रमुख सतीश ढवळे अथवा भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख नितीन पाटील यांनीही दोघांपैकी एकजण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. तटाकडील तालीम आणि दुधाळी प्रभागातूनही उमेदवार जाहीर केले आहेत. निष्ठावंतांना उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले. शिवसेनेच्यावतीने बुधवारी पहिली ४१ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती व त्यानंतर शनिवारी १७ उमेदवार जाहीर केले. यामध्ये शिवसेनेच्यावतीने निष्ठावंतांना उमेदवारी दिल्याचा दावा नेत्यांनी केला आहे; पण तटाकडील तालीम प्रभाग क्र. ४८ मधून रिक्षाचालक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती; पण ऐनवेळी या प्रभागातून माजी महापौर उदय साळोखे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या राजू जाधव यांनी कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले. यापूर्वी उदय साळोखे व त्यांची पत्नी पूजाश्री साळोखे हे शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते; पण त्यानंतर ते जनसुराज्य पक्षातर्फे महापौर झाले. शनिवारी उमेदवारी निश्चितीच्या यादीत उदय साळोखे यांना तटाकडील तालीम प्रभागातून पुन्हा उमेदवारी दिल्याने दुसरे इच्छुक राजू जाधव हे नाराज झाले. जाधव यांनी, गेली वीस वर्षे शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ, प्रामाणिकपणे राहिलो, आंदोलनात सहभाग घेतला, पण त्याचे हेच फळ का? असाही प्रश्न उपस्थित करून निवडणुकीत झालेल्या अन्यायाविरोधात अपक्ष म्हणून लढणार असल्याचे जाहीर केले. दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी काँग्रेसी विचाराशी बांधील असणाऱ्या तसेच शिवसेनेच्या ध्येयधोरणांचा काहीही गंध नसणाऱ्याला देऊन निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख नितीन पाटील व दुधाळी शिवसेना शाखाप्रमुख सतीश ढवळे यांनी केला आहे. या प्रभागातून दुधाळी शाखेच्यावतीने यशवंत ऊर्फ नाना सुर्वे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळण्याबाबत शिफारस केली होती; पण कोल्हापुरात स्वत:ला शिवसेनेचा सर्वेसर्वा समजणाऱ्या एका नेत्याने केवळ मैत्री जपण्यासाठी काँग्रेसी विचारांच्या व्यक्तीस उमेदवारी दिल्याचा आरोप ढवळे आणि पाटील यांनी केला.