शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

शिवसेनेचा कल भाजपकडे

By admin | Updated: March 20, 2017 00:59 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न; उद्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवड

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सत्तासंघर्षात शिवसेनेच्या बहुतांश सदस्यांचा कल भाजपकडे असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे भाजपचे पारडे जड वाटत असले तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे शर्थीचे प्रयत्न पाहता सत्तेचा लंबक दोलायमान अवस्थेतच आहे. भाजता आणि दोन्ही कॉँग्रेसदरम्यान जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठीचा संघर्ष २३ फेब्रुवारीपासून सुरू आहे. शिवसेनेला १० जागा मिळाल्यामुळे त्यांच्या भूमिकेला कमालीचे महत्त्व आले; परंतु ‘मातोश्री’चा स्वतंत्र आदेश येणार नसल्याचे स्पष्ट असल्याने शिवसेनेच्या आमदारांनी आपल्या पुढच्या विधानसभेचा विचार करून आपापल्या भूमिका घेतल्याचे रविवारी स्पष्ट झाले. सायंकाळी रेसिडेन्सी क्लबवर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, शिवसेनेचे नेते संजयबाबा घाटगे, आदींनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य अंबरीश घाटगे हेदेखील होते. हे सर्वजण चर्चा करून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच माजी आमदार महादेवराव महाडिक आणि ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक हेही ‘रेसिडन्सी’वर दाखल झाले. गेल्या दोन दिवसांमध्ये महाडिक थेट या मैदानामध्ये उतरल्याने या सत्तासंघर्षातील काही मोहऱ्यांनी आपली भूमिका भाजपला पूरक अशी घेण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. (पान ८ वर)आवाडे आमच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा निरोप प्रकाश आवाडे यांना दिला आहे. त्यामुळे आवाडे पक्षासोबतच राहतील, असा विश्वास निरीक्षक माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला आहे. मी आणि मुश्रीफ यांनी आवाडे यांच्याशी चर्चा केली असून, ते आमच्यासोबत राहतील, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. अध्यक्ष आमचाच : चंद्रकांतदादाकाहीही झाले तरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचाच होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सत्ता बनविण्यासाठी मुंबईहून कोल्हापूरला आलो आहे, असे सांगत पाटील यांनी आपला आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.