शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतर्फे बाजार समितीचे प्रशासक धारेवर

By admin | Updated: April 30, 2015 00:22 IST

तीव्र आंदोलनाचा इशारा : घोटाळ्याबाबत सखोल चौकशीचे रंजन लाखे यांचे आश्वासन

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या आणि कृषिपूरक व्यवसाय सोडून इतर व्यवसायांना परवानगी दिल्याच्या कारणावरून शिवसेनेच्यावतीने बुधवारी बाजार समितीमध्ये प्रशासकांना चांगलेच धारेवर धरले. घोटाळ्याचा अहवाल प्रधान सचिवांना देण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बाजार समितीचे प्रशासक रंजन लाखे यांनी याबाबत सखोल चौकशी करून याबाबतचा सविस्तर अहवाल सहकारमंत्र्यांच्या प्रधान सचिवांकडे पाठवू, असे आश्वासन आंदोलकांना दिले. जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, बाजार समितीमधील पूर्र्वीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराबाबत आपण तयार केलेल्या अहवालाची अद्याप अंमलबजावणी का झाली नाही? शेतीशी संबंधित नसलेल्या संस्थांना जागा देण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांना कवडीमोल दरात जागा दिल्या आहेत. अशा लुटारू संचालकांवर कारवाईसाठी कोणतीच पावले उचलली का जात नाहीत, याचा जाब विचारत प्रशासकांना चांगलेच धारेवर धरले. बाजार समितीची लूट करणाऱ्या व्यापारी आणि माजी संचालकांवर कारवाई करावी, तसेच अपात्र ठरविलेल्या संचालकांना बाजार समितीच्या निवडणुकीपासून रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली. या मागणीची दखल घेतली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. विजय देवणे, कमलाकर जगदाळे, रवी चौगुले, विनायक साळुंखे, बाजीराव पाटील, प्रा. शिवाजी पाटील, सुजित चव्हाण, प्रवीण सावंत, तानाजी आंग्रे, हर्षल सुर्वे, विराज पाटील, प्रवीण पालव, सुषमा चव्हाण, सुजाता सोहनी, रंजना आंबेकर, दीपाली शिंदे, कमल पाटील, सुमन शिंदे, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रश्नांवर धरले धारेवर...कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या अहवालाची अद्याप अंमलबजावणी का झाली नाही ? राजर्षी शाहू सांस्कृतिक हॉलचा ज्या कंपनीशी करार झाला आहे, तो त्वरित रद्द करावा. समितीच्या आवारात झालेले अतिक्रमण हटविण्यात कुचराई करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनागोंदी कारभार, शेतीपूरक उद्योग सोडून अन्य उद्योगांना दिलेली परवानगी यांसह विविध मुद्द्यांवर जाब विचारला.