शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन

By admin | Updated: June 7, 2017 01:05 IST

जयघोषाचा अखंड गजर : राज्यातील १४ विद्यापीठांच्या एनएसएस स्वयंसेवकांची उपस्थित्ती; ढोलताशांच्या निनादाने शिवाजी विद्यापीठात चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या जयघोषाचा अखंंड गजर आणि ढोलताशांच्या निनादात शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात आला. विद्यापीठात सुरू असलेल्या ‘आव्हान’ शिबिरातील सहभागी १४ विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सुमारे १२०० शिबिरार्थी स्वयंसेवकांनी परिसरात चैतन्य निर्माण केले. त्यांच्या उत्साहाने विद्यापीठातील सकाळचे वातावरण शिवमय बनले. ‘आव्हान’मधील स्वयंसेवकांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती जमून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाचा अखंड गजर, ढोलताशांचा निनाद यांच्या तालावर विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनाची सकाळ शिवमय बनविली. यावेळी ‘एन. एस. एस.’चे स्वयंसेवक अक्षय चव्हाण, तेजस घुलघुले यांनी केलेल्या शिवगर्जनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभारले. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जोसेस वढाईने प्रेरणादायी शिवगीत सादर केले. सर्व मान्यवर ढोलताशांच्या गजरात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात जमले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एन.एस.एस.चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, एन.डी.आर.एफ.चे निरीक्षक एस. डी. इंगळे, नागरबाई शिंदे, अनिता शिंदे, डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते.शिबिरार्थींकडून अनोख्या पद्धतीने अभिवादनशिबिरार्थींनी अत्यंत अनोख्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केले. राज्याच्या १४ विद्यापीठांतून आलेल्या स्वयंसेवकांची पन्हाळा, भिवगड, कन्हेरगड, रायगड आणि देवगिरी पाच गटांत विभागणी केली. त्यांना अनुक्रमे भगवा, पांढरा, हिरवा, आकाशी आणि गडद निळा असे पाच रंगांचे गणवेश देण्यात आले होते. यांपैकी पांढऱ्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याभोवती गोल कडे केले आणि इतर संघांनी पुतळ्याच्या बागेभोवती गोल कडे करीत रंगीबेरंगी स्वस्तिक साकारले.शिवराय हे ज्ञानाचे प्रतीकछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शौर्याचेच नव्हे, तर ज्ञानाचेही प्रतीक आहेत. म्हणूनच आज जगभर त्यांच्या युद्धनीतीचा आणि कुशल व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास केला जातो, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी येथे केले. विद्यापीठात सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात त्यांनी मार्गदर्शन केले.