शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवनेरी’ची कोल्हापूर वारी अखेर बंद

By admin | Updated: April 19, 2015 01:08 IST

कोल्हापूर-पुणे व्होल्वो बंद : पाच सेवा ठप्प होणार; मुंबईकडे पळविल्याची चर्चा

प्रदीप शिंदे / कोल्हापूर गेल्या पाच वर्षांपासून खासगी आरामबसच्या धर्तीवर सेवा देणारी शिवनेरी व्होल्वो बसची कोल्हापूर-पुणे ही सेवा आता २५ एप्रिलपासून बंद होणार आहे. प्रवासी कमी असल्याचे कारण पुढे करीत ती, पुणे-मुंबई (दादर) अशी पळविल्याची चर्चा आहे. यामुळे ऐन उन्हाळी सुटीत प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने याबाबत प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापूर-पुणे ही शिवनेरी व्होल्वो बससेवा १ मे २०१० रोजी कोल्हापुरातून सुरू केली होती. महामंडळाच्या पुणे येथील प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने कोल्हापूर-पुणे येथील शिवनेरीच्या फेऱ्यांचे भारमान पुणे-दादर-मुंबई व ठाणे या मार्गांवरील फेऱ्यांपेक्षा कमी असल्याने तसेच पुणे विभागाकडे असलेल्या भाडेतत्त्वावरील बसेसच्या कराराची मुदत पूर्ण होत असल्याने तसेच पुणे विभागास वाहतुकीसाठी भाडेतत्त्वावरील वातानुकूलित बसेस कमी पडत असल्याने ही सेवा बंद करण्यात आहे. कोल्हापूर-पुणे शिवनेरीचा तिकिटाचा दर ६२५ रुपये आहे. याच मार्गावर वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्होल्वोचा दर ४५० रुपये आहे. खासगी आराम बस कंपन्या दर शनिवार-रविवारी काही वेळेला ५०० रुपये घेतात. कोल्हापूर-पुणे शिवनेरी बसने प्रवास करायचा म्हटले की, प्रवाशांना १६५ रुपयांचा जादा भुर्दंड बसत होता. महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयात बसून निश्चित केलेले दर आणि त्यामध्ये बदल करण्याची मानसिकता नसल्याने त्याचा प्रवाशांना मात्र नाहक आर्थिक भुर्दंड बसतो. खासगी गाड्यांइतकाच दर ठेवावा, अशी मागणी प्रवाशांनी वारंवार करूनही त्याकडे महामंडळ गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. त्याचा परिणाम म्हणून प्रवासी खासगी व्होल्वो बसलाच पसंती देत आहेत. याचा परिणाम या महामंडळाच्या ‘शिवनेरी’ सेवेवर होऊ लागल्याने दिसत आहे. कोल्हापुरात पाच वर्षे अखंड सेवा देणारी ही गाडी आता बंद होणार आहे. ६५ हजार प्रवाशांनी केला प्रवास कोल्हापूर - पुणे शिवनेरीचा तिकीट दर जरी जास्त असला तरी १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या दरम्यान ६५ हजार ७०८ प्रवाशांनी या गाडीचा लाभ घेतला. विश्वासार्हता, वेळेत सुटत व पोहोचत असल्याने ही गाडी लोकप्रिय बनली होती. या गाड्यांमार्फत कोल्हापूर विभागाला १६ लाख २७ हजार रुपये इतका फायदा झाला होता. ऐन उन्हाळी सुटीत ही गाडी बंद केल्याने प्रवाशांमधून नाराजी होत आहे.