शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिवतारे यांचा दौरा दिलासा देणार?

By admin | Updated: April 22, 2016 00:51 IST

राधानगरी तालुका : प्रकल्पांची पाहणी करणार

संजय पारकर -- राधानगरी --पाण्याचा खजिना म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यात पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काही प्रकल्प अपूर्ण, तर जुन्या प्रकल्पाच्या देखभालीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे लोकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. पाटबंधारे राज्यमंत्री विजय शिवतारे आज, शुक्रवारी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते काही प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याने तरी यापैकी काही प्रश्न सुटतात की हा केवळ फार्स ठरतो हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.राजर्षी शाहू महाराजांनी उभारणी केलेल्या ऐतिहासिक राधानगरी धरणावरील राज्यातील पहिला जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सध्या संक्रमणावस्थेत आहे. दहा वर्षांपूर्वी स्वीकारलेल्या ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या धोरणानुसार येथे या प्रकाराचाही राज्यातील पहिला प्रकल्प सुरू झाला आहे. यावेळी वरिष्ठ पातळीवर झालेल्या करारानुसार जुना प्रकल्प पूर्णपणे बंद करण्याची अट आहे. मात्र, त्यात शासनाच्या हितालाच हरताळ फासला आहे. किरकोळ देखभाल केली तर हा प्रकल्प आजही पूर्ण क्षमतेने चालू शकतो. मात्र, त्याला पाणीच मिळत नाही. या धरण परिसरात शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने खास तरतूद केली आहे. त्यालाही नियमांच्या आडून विरोध केला जात आहे. धरण उभारणी काळात हत्तीमहाल येथे विश्रामग्रह व वसाहत उभारली होती. देखभाल नसल्याने हे विश्रामगृह कुलूपबंद आहे, तर वसाहत ओस पडण्याच्या वाटेवर आहे.शंभर वर्षे पूर्ण झालेल्या राधानगरी धरणात रिकाम्या झालेल्या भागात सध्या प्रचंड गाळ साचल्याचे दिसते. येथे प्रचंड पाऊस पडतो, पण क्षमता कमी आहे. कितीतरी पाणी पावसाळ्यात वाहून जाते. या धरणावरील स्वयंचलित दरवाजे हा येथील ऐतिहासिक वारसा आहे. त्याची रचना बदलण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याला लोकांचा विरोध आहे त्याचीही दखल घ्यावी लागणार आहे.