जयसिंगपूर : कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांना दिलासा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवार सामाजिक विकास सेवा व संशोधन संस्थेच्यावतीने कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आज बुधवारी जयसिंगपूर येथे उपचार केंद्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
शेट्टी म्हणाले, जयसिंगपूर कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये सर्वसोयींनियुक्त उपचार केंद्र सुरू केले जाणार आहे. याठिकाणी २० ऑक्सिजन बेड आणि ३० बेडचा अलगीकरण विभाग सुरू केला जाणार आहे.
स्वाभिमानी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी उपचार केंद्राला मदत दिली. यावेळी सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, डॉ. श्रीवर्धन पाटील, डॉ. सुभाष अडदंडे, शैलेश चौगुले, सागर संभूशेटे, सौरभ शेट्टी, मिलिंद साखरपे, महावीर पाटील, राजू नरदे, वासुदेव भोजणे, डॉ. अकलंक चौगुले, शितल गतारे, शैलेश आडके, शंकर नाळे, सागर मादनाईक आदी उपस्थित होते.
---------------------
चौकट -
दातृत्वांकडून मदत
सेंटरला भरत मेडिकल ट्रस्ट, ताराराणी आघाडीचे याला सहकार्य मिळत आहे. रुग्णांसह नातेवाईकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे उपचार केंद्र सुरू होत आहे. याला अनेकांकडून दातृत्वाच्या नात्याने मदत केली जात आहे. सर्वच स्तरातील रुग्णांना नाममात्र दरात याठिकाणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार आहेत.
फोटो - ११०५२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाहणी केली.