शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कलागुणांच्या उधळणीत रंगला ‘शिवमहोत्सव’

By admin | Updated: February 22, 2016 01:05 IST

शिवाजी विद्यापीठ : शिवजीवनगौरव पुरस्काराने बाबा सावंत सन्मानित; सातजणांना शिव पुरस्कार

कोल्हापूर : नृत्य, गायन अशा कलागुणांच्या उधळणीत रविवारी शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीतर्फे आयोजित शिवमहोत्सव रंगला. त्यात समितीतर्फे विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांना नागरबाई शिंदे यांच्या हस्ते ‘शिवजीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठातील सात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, तर विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. भारत खराटे, ‘मनसे’चे मंदार पाटील प्रमुख उपस्थित होते. प्रा. आर. जी. दंडगे, व्ही. एल. अंत्रेडी, विजय फुलारी, अरुण वणिरे, शंकर कोगले, धैर्यशील यादव, अरविंद पोवार यांना शिवपुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिवमहोत्सवाचे संकल्पक डॉ. प्रवीण कोडोलीकर, अध्यक्ष डॉ. चांगदेव बंडगर, सागर बगाडे, संजय मोहिते, सागर चव्हाण, आदी उपस्थित होते. डॉ. सरोज बिडकर यांनी प्रास्ताविक केले. सत्यजित कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले. अनंत पाटील यांनी आभार मानले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. श्वास अकॅडमीने शिवचरित्र सादर केले. हेल्पर्स अ‍ॅन्ड हॅण्डीकॅपच्या विद्यार्थ्यांनी ‘जश्न हे जितका’, अवनि संस्थेच्या ‘तारे जमीं पर’ नृत्य सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली. सार्थक क्रिएशन्स्च्या ‘शिवस्तुती’ नृत्य, कोणार्क शर्मा, वेदांती सोनुले, वैदेही जाधव, कबीर यांच्या गायनाने कार्यक्रमांत रंग भरला. लघुपट महोत्सवातून प्रबोधन शिवमहोत्सवात सकाळी कोल्हापुरातील लघुपटांचा महोत्सव झाला. त्याचे उद्घाटन प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या हस्ते कवी डॉ. राज होळकर यांच्या उपस्थितीत झाले. त्याची सुरुवात हेल्पिंग हँडने (महेशकुमार सरतापे) झाली. त्यानंतर फेटा, गूळ, साज, चप्पल या कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची निर्मिती दाखविणारे इन्स्पिरेशन आॅफ कोल्हापूर (प्रसाद महेकर), युवकांना जबाबदारीची जाणीव करून देणारा व्हेकेशन (अनुप बेलवलकर), वाहतुकीतील स्वयंशिस्तीचे महत्त्व सांगणारे ट्रॅफिक (स्नेहलराज संकपाळ), एक क्षण (अजय खाडे), विकारवशता सोडण्याचा संदेश देणारे विसर्जन (उमेश बगाडे) यांचे सादरीकरण झाले. कोलाज (साईप्रसाद पोतदार) मधून पर्यावरण रक्षण, आर्म थीपद्वारे (प्रशांत सुतार) व्याघ्र संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर आशा (चैतन्य डोंगरे), ह्युमॅनिटी (नीलेश बोडके), प्रतीक्षा (अमृता पाटील), ए डार्क क्लाऊडी डे (किरण चव्हाण), चिनू (विक्रम शिंदे) यांचे सादरीकरण झाले. ‘दहशतवाद’ने लघुपटाने महोत्सवाचा समारोप झाला. शुभम चेचरच्या ‘गुमस्ता’ व सागर ढेकणेच्या ‘माझे आधारकार्ड’चा प्रीमिअर शो झाला. आलोक जत्राटकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)