शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना शिवाजी विद्यापीठाचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील महापूर परिस्थितीमध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने महानगरपालिका यंत्रणेच्या माध्यमातून शहर व परिसराला पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील महापूर परिस्थितीमध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने महानगरपालिका यंत्रणेच्या माध्यमातून शहर व परिसराला पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी उचलली आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्यासाठी परिसरातील गवत पुरविण्याचाही निर्णय घेतला आहे.

अतिवृष्टीमुळे शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा करणारे महानगरपालिकेचे सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न उद्भवल्याचे लक्षात येताच विद्यापीठ प्रशासनाने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आपल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे शहराला पाणी पुरविण्याची तयारी केली. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी कुलगुरू डॉ. शिर्के यांची चर्चा होऊन शनिवारी सकाळपासून महानगरपालिकेच्या टँकरच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला.

त्याचप्रमाणे शहरात ठिकठिकाणी पाळीव पशुधनासाठी चारा छावण्या निर्माण करण्यात आल्या आहेत. पुरामुळे या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी विद्यापीठाच्या परिसरातून गवत पुरविण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.

प्रतिक्रिया

सन २०१९च्या पूरस्थितीमध्ये कोल्हापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळीही विद्यापीठाने महापालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून शहराला पिण्याचे पाणी पुरविले होते. हा अनुभव लक्षात घेऊन यंदाही विद्यापीठाने आपली यंत्रणा तयार ठेवली होती. त्यानुसार शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यास सुरू केले आहे. त्याचप्रमाणे या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असतो. त्यासाठीही विद्यापीठाने आपल्या परिसरातील गवत पुरविण्याची तयारी केली आहे.

-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

फोटो (शिवाजी विद्यापीठ या नावाने फोटो कोलडेस्कवर पाठविला आहे) : कोल्हापूर शहरात उद्भवलेल्या पूरस्थितीमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी शनिवारी सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या जल शुद्धीकरण केंद्राद्वारे शहराला पाणी पुरविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह अभियांत्रिकी विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.