शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या ‘गोंधळा’ने विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: April 28, 2017 01:08 IST

प्रश्नपत्रिका नियोजन, वितरणात गडबड : परीक्षा विभाग, प्रश्न नियोजक, केंद्रातील असमन्वय कारणीभूत

संतोष मिठारी --कोल्हापूर -अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न, चुकीच्या सत्रातील प्रश्नपत्रिकांचे वितरण, प्रवेशपत्रांवर पेपरच्या वेळेची चुकीची नोंद अशा स्वरुपात शिवाजी विद्यापीठाचा परीक्षा कालावधीत ‘गोंधळ’ सुरू आहे. कधी परीक्षा केंद्र, कधी प्रश्ननियोजक, तर कधी विद्यापीठातील परीक्षा विभाग यांच्या चुकीचा, एकमेकांमधील असमन्वयाचा फटका परीक्षार्थींना बसत आहे.प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रात पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. त्यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, आदी नऊ विद्याशाखांतील १८६ अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा समावेश आहे. सुमारे पावणेसहा लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षा देतात. दुसऱ्या सत्रातील परीक्षा २४ मार्चपासून सुरू झाल्या आहेत. प्रश्नपत्रिकांच्या वितरणासाठी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून सिक्युर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी, गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण) या प्रणालींचा वापर केला जातो. याबाबत परीक्षा विषयक काम करणाऱ्या महाविद्यालय, विद्यापीठ पातळीवरील घटकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आहेत. पेपरफुटीसारखे प्रकार ‘एसआरपीडी’च्या वापरामुळे घडलेले नाहीत. ही परीक्षा मंडळाची जमेची आणि चांगली बाजू आहे. मात्र, तंत्रज्ञानाऐवजी ज्याठिकाणी प्रत्यक्ष व्यक्तींद्वारे काम होणाऱ्या टप्प्यावर परीक्षा मंडळाची यंत्रणा गडबडून जात आहे. त्यात ‘एसआरपीडी’द्वारे प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि प्रश्ननियोजकाकडून प्रश्नपत्रिका तयार करणे, ती गोपनियतेसाठी पाकीटबंद करणे या टप्प्यांवर होणाऱ्या चुकांचा अधिकतर समावेश आहे. या चुकांचा नाहक त्रास हा वर्षभर अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सहन करावा लागत आहे. परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थी हे काहीसे तणावाखाली असतात. ऐनपेपरच्या वेळी तो चुकीचा अथवा उशिरा मिळणे असे प्रकार घडल्यास परीक्षार्थी गोंधळून जातात. त्याचा परिणाम त्यांच्या पेपरच्या लेखनावर होण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊन विद्यापीठाने परीक्षांच्या कालावधीतील हा गोंधळ कायमचा संपविण्यासाठी तातडीने पाऊल उचलणे आवश्यक आहे.याचा विचार करावापरीक्षेत आजअखेर घडलेले प्रकार३ नोव्हेंबर २०१६ : कोल्हापुरातील एका केंद्रावर बीबीए अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्रातील ‘संख्याशास्त्रा’च्या विद्यार्थ्यांना दोन तास उशिरा पेपरचे वितरण. २९ नोव्हेंबर २०१६ : बी. कॉम. (पाचवे सत्र) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ‘बिझनेस एन्व्हायर्न्मेंट’ पेपरच्या वेळीची प्रवेशपत्रावर चुकीची छपाई.३१ मार्च २०१७ : बी. ए. भाग तीनच्या सहाव्या सत्रातील समाजशास्त्र या अभ्यासक्रमाच्या पेपर क्रमांक १६ करिता पाचव्या सत्रातील अभ्यासक्रमांवरील प्रश्नपत्रिकेची छपाई झाल्याने पेपर रद्द.११ एप्रिल २०१७ : बी. एस्सी. भाग तीनच्या प्राणीशास्त्र विषयाच्या पेपर क्रमांक १३ आणि १४ मध्ये तीन वर्षांपूर्वीच्या अभ्यासक्रमांवरील प्रश्न विचारण्याचा प्रकार. २६ एप्रिल २०१७ : ‘एम. कॉम. भाग एक’ पुनर्रपरीक्षार्थींच्या ‘मॅनेजमेंट कन्स्पेट अ‍ॅण्ड आॅर्गनायझेशनल बिहेव्हिअर’ या विषयाचा दुसऱ्या सत्रातील पेपरवेळी पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिकांचे वितरण. 1‘नॅक’ चे मानांकन असो की, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, आॅल इंडिया सर्व्हे आॅन हायर एज्युकेशन, नेचर पब्लिकेशन ग्रुपच्या ई-जर्नल वापराचे सर्वेक्षण यामध्ये अव्वल स्थानी राहून आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाने गुणवत्ता सिद्ध केली आहे.