शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागातील प्राध्यापक ठरले ‘मॅपाथोन चॅम्पियन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST

या स्पर्धेसाठी प्रा. पन्हाळकर व त्यांच्या टीमने ‘फ्लड रिस्क असेसमेंट ऑफ पंचगंगा रिव्हर’ आणि ‘लँडस्लाईड रिस्क असेसमेंट ऑफ एसडब्ल्यू ...

या स्पर्धेसाठी प्रा. पन्हाळकर व त्यांच्या टीमने ‘फ्लड रिस्क असेसमेंट ऑफ पंचगंगा रिव्हर’ आणि ‘लँडस्लाईड रिस्क असेसमेंट ऑफ एसडब्ल्यू महाराष्ट्र’ हे विषय निवडले. त्यातून त्यांनी कोल्हापूर आणि परिसरातील स्थानिक भौगोलिक समस्या नकाशांमधून सादर केल्या. कोल्हापूर शहरानजीक वाहणाऱ्या पंचगंगा नदीला येणाऱ्या पुराचा रिस्क झोन नकाशा उपग्रहीय माहिती आणि जीआयएस सॉफ्टवेअरचा वापर करून तयार केला. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यादरम्यान असणाऱ्या पश्चिम घाटातील घाटरस्त्यांवर होणारे भूस्कलनही या नकाशांद्वारे त्यांनी सादर केले. या नकाशांसाठी प्रथमच भूगोल अधिविभागाने बारकोड प्रणालीचा वापर केला गेला. नकाशावरील बारकोड स्कॅन करताच मॅपमधील माहिती मोबाइलमध्ये असणाऱ्या गुगलमॅपवर दिसेल. अशा प्रकारचे तंत्रज्ञान या नकाशामधून सादर केले. त्याचा वापर या भागातील लोकवस्ती आणि प्रशासकीय अधिकारी यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी होऊ शकतो, हे त्यांनी मांडले. विद्यापीठातील या प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले.

चौकट

अत्याधुनिक नकाशे तयार करण्याचे उद्दिष्ट

मॅपाथोन ही एक विशिष्ट स्थानबद्ध समस्येवर उपाययोजनेसाठी घेतलेली राष्ट्रीय स्थरावरील मॅपिंग स्पर्धा आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने संशोधनासाठी भारतीय उपग्रहांनी घेतलेली माहिती, भुवन, एनआरएससी, आदी प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध करून दिली आहे. या माहितीमध्ये भारतीय संसाधने, शेती, हवामान, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण व शहरी नियोजन आणि भविष्यातील विकासाचे मार्ग ओळखण्याची क्षमता आहे. भारतीय रिमोट सेन्सिंग डेटाची क्षमता समजून घेणे आणि ओपन सोर्से सॉफ्टवेअरचा वापर करून भारतीय विभागांसाठी अत्याधुनिक नकाशे तयार करणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते.

फोटो (१८०३२०२१-कोल-मॅपाथोन स्पर्धा) : राष्ट्रीय मॅपाथोन चॅम्पियन ठरलेल्या शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागातील प्रा. सचिन पन्हाळकर, अभिजीत पाटील यांचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी अभिनंदन केले.