शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुणामागे जायचं शिवाजी पेठेला चांगलं कळतं

By admin | Updated: August 27, 2016 00:46 IST

हद्दवाढ समर्थकांची पेठेत बैठक : चंद्रदीप नरकेंना नेत्यांनी फटकारलं

कोल्हापूर : शिवाजी पेठेची जनता सुज्ञ असून, तिला कोणाच्या मागे जायचं हे चांगलं कळतंय. पेठेतील जनतेने ज्या आंदोलनांत भाग घेतला, ती यशस्वी झाली आहेत. हद्दवाढीसंदर्भातील आंदोलनही यशस्वी होईल. त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके यांनी चुकीचे वक्तव्य करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन शिवाजी पेठेतील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या मेळाव्यात करण्यात केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ आंदोलनात शिवाजी पेठेतील तालीम, मंडळे नेत्यांच्या मागे नसून ती आपल्या पाठीशी आहेत, असे वक्तव्य आमदार चंद्रदीप नरके यांनी नुकतेच केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि शिवाजी पेठेतील जनता, तालीम, मंडळे ही हद्दवाढीच्या मागणीशी ठाम असल्याचे दाखवून देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यात आमदार नरके यांना अनेक नेत्यांनी फटकारले. पेठेत राहून पेठेतील जनतेबद्दल चुकीचे वक्तव्य करणे हा पेठेच्या अस्मितेला धक्का असल्याचे सांगत नरके यांचा निषेध करण्यात आला.पेठ विकासात अग्रेसरचनरके सांगतात म्हणून पेठेची जनता त्यांच्या मागे नाही. कोणाच्या मागे जायचं हे इथल्या जनतेला चांगलं कळतंय. शिवाजी पेठ ही आतापर्यंत चांगल्या कामांत अग्रेसर राहिली आणि शहराच्या विकासातही ती पुढेच राहील, असे मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ चव्हाण म्हणाले. शहरात राहून शहराविरोधात भूमिका घ्यायची आणि पेठेतील जनतेबद्दल गैरसमज पसरविणारे वक्तव्य करायचे हे बरोबर नाही. आमदार नरके यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, असे आवाहन माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी केले. शिवाजी पेठेबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम नरके यांनी थांबवावे, असे आवाहन महेश जाधव यांनी केले. शिवाजी पेठेतील सर्व मंडळे ही हद्दवाढ होण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांचा आंदोलनास सक्रिय पाठिंबा आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी महापौर रामाणे, माजी महापौर आर. के. पोवार, विलासराव सासने, राजू लाटकर, शिवाजीराव जाधव, सतीश कांबळे, अजित राऊत यांची भाषणे झाली. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, परिवहन सभापती लाला भोसले, महिला व बालकल्याण सभापती वृषाली कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, अमोल माने, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कधी जिना उतरून खाली आला का? नरके हे शिवाजी पेठेत राहतात; पण पेठेसाठी त्यांचे योगदान काय? असा प्रश्न आम्ही कधी विचारत नाही. जर तुमच्या मागे तालीम, मंडळं असतील तर हद्दवाढीला विरोध करणाऱ्या एका तरी मंडळाचे पत्र आणावे, असे आव्हान माजी नगरसेवक रवी इंगवले यांनी दिले. पेठेत काय घडलं तर कधी जिना उतरून खाली आला होता का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दादांचे शेरोशायरीने उत्तररामभाऊ चव्हाण यांचं भाषण त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखंच रांगडं! त्यांनी आपल्या भाषणाची सांगता चक्क शेरोशायरीने केली. ‘आसूॅँओं से लिखता हूॅँ, पागल मत समझना; शिवाजी पेठ के कार्यकर्तांओं के किए तडपता हूॅँ, पागल नहीं समझना’, अशा शब्दांत आमदार नरके यांना उत्तर देताच दादांच्या या शायरीला उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली.