शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

शिवभक्त रायगडकडे रवाना

By admin | Updated: June 5, 2015 01:03 IST

भवानी मंडप दुमदुमला : सुमारे २८ हजारजणांचा समावेश

कोल्हापूर : ‘जय भवानी... जय शिवाजी’चा जय जयकार... भिरभिरणारे भगवे ध्वज... अशा उत्साही वातावरणात गुरुवारी रात्री भवानी मंडपातून हजारो शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडकडे रवाना झाले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे रायगडावर आज, शुक्रवारी व उद्या शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून जाणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांचे पूजन युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष फत्तेसिंह सावंत, माजी नगरसेवक ईश्वर परमार, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जे. डी. जाधव, अमर पाटील, शिवाजी बसुगडे आदी उपस्थित होते. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भवानी मंडप परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रायगडला रवाना होण्यासाठी रात्री नऊ वाजल्यापासून शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून शिवभक्त येत होते. तासाभरात शिवभक्तांची गर्दी झाली. भवानी मंडपामधून ४२ वाहनांसह २८ हजारांहून अधिक शिवप्रेमींनी रायगडाकडे कूच केली. जिल्ह्यातील विविध भागांत त्या-त्या ठिकाणी वाहनांचे ताफे राष्ट्रीय महामार्गावर एकत्र आले तेथून १५७ वाहनांचा एकत्रित ताफा रात्री साडेअकराच्या सुमारास रायगडाकडे रवाना झाला. (प्रतिनिधी) भवानी मंडप दुमदुमला : सुमारे २८ हजारजणांचा समावेश