शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST

मंगळवार पेठ, राजर्षी शाहू तरुण मंडळ मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी येथे शासकीय नियम पाळून सुशीला ...

मंगळवार पेठ, राजर्षी शाहू तरुण मंडळ

मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी येथे शासकीय नियम पाळून सुशीला देसाई, लता डवरी, वासंती घोरपडे, दीपाली धनवडे, शिल्पा सरवदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर पाळणा म्हणण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बाबूराव चव्हाण, आनंदराव पायमल, अशोक पोवार, रमेश मोरे, संदीप चौगुले, बापू आवळे, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते.

१३०५२०२१-कोल-राजर्षी शाहू मंडळ

आेळी : राजर्षी शाहू तरुण मंडळाच्यावतीने मिरजकर तिकटी येथे गुरुवारी सुशीला देसाई, लता डवरी, वासंती घोरपडे, दीपाली धनवडे, शिल्पा सरवदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.

शिवाजी पेठ, नेताजी तरुण मंडळ

शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळाच्यावतीने पारंपरिक शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. न्यू काॅलेजचे प्राचार्य डाॅ. व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, लालासाहेब गायकवाड, शिवाजीराव पोवार, जयवंतराव साळोखे, प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित शिंत्रे, रवींद्र राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो : १३०५२०२१-कोल-नेताजी तरुण मंडळ

आेळी : शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळाच्यावतीने गुरुवारी शिवजयंतीनिमित्त प्राचार्य डाॅ. व्ही. एम. पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन झाले.

संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था

जुना बुधवार पेठेतील संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्यावतीने गुरुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवप्रार्थना प्रेरणास्त्रोत पठण करण्यात आले. यासोबतच शिवशस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. यानिमित्त परिसरातील घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सावंत, सचिव सुशील भांदिगरे, संजय पाटील, उदय भोसले, नागेश घोरपडे, अनिल निकम, मकरंद स्वामी, राजू कुंडले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, संदीप देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.

१३०५२०२१-कोल-जुना बुधवार पेठ

आेळी : संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे गुरुवारी शिवजयंतीनिमित्त इतिहासकालीन शिवशस्त्र पूजन करण्यात आले.

संयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती सोहळा समिती

उत्तरेश्वर पेठेतील संयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती सोहळा समितीतर्फे गुरुवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, सुनील कांबळे, तुलसीदास कांबळे, विलास कांबळे, राजेंद्र कांबळे, (सर्व स्मशानभूमीतील कर्मचारी) यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्वांचा उत्तरेश्वर पेठेतर्फे कोरोना योद्धा म्हणून शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे किशोर घाडगे, भाऊ घाेडके, दीपक काटकर, विराज चिखलीकर, सुरेश कदम, विनायक साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.

१३०५२०२१-कोल-उत्तरेश्वर पेठ

फोटो आेळी : संयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे गुरुवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समिती

संयुक्त रविवार पेठ शिवजयंती उत्सव समितीतर्फे बिंदू चाैकात शिवजयंतीनिमित्त महापालिका कर्मचारी प्रीती चंदुगडे, पूजा भोर, सेजल मोरे यांच्या हस्ते पुतळा व पाळणा पूजन झाले. यावेळी जयेश कदम, जयेश ओसवाल, सचिन तोडकर, आप्पा लाड, प्रवीण सोनवणे, संजय कदम, महेश ढवळे, बाळासाहेब मुधोळकर, सुधीर खराडे, अजित गायकवाड, वनिता ढवळे, पूजा शिराळकर, धनश्री तोडकर आदी उपस्थित होते.

फोटो : १३००५२०२१-कोल- रविवार पेठ

आेळी : रविवार पेठ संयुक्त शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित बिंदू चौकात महापालिका महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते पाळणा पूजन झाले.

छत्रपती शहाजी तरुण मंडळ

छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शहाजी तरुण मंडळातर्फे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते गुरुवारी पाळणा पूजन झाले. यावेळी आर. के. पोवार, ईश्वर परमार, आदिल फरास, उदय शिंदे, सागर शिंदे, संजय केसरकर, शिवाजी यादव, हेमंत मेंहदळे आदी उपस्थित होते.

फोटो : १३०५२०२१-कोल-शिवाजी चौक

आेळी : शिवाजी चौकातील छत्रपती शहाजी तरुण मंडळातर्फे गुरुवारी शिवजयंतीनिमित्त पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या हस्ते पाळणा पूजन झाले.

हिंदू एकता

हिंदू एकता संघटनेच्यावतीने शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पु्ष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, माजी नगरसेवक ईश्वर परमार, आण्णा पोतदार, बापू वडगावकर, गजानन तोडकर, सुरेश काकडे, हिंदुराव शेळके, सुरजित गायकवाड, विलास मोहिते, दिलीप सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.