शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

भूसंपादन विरोधात शिवसेनेचा मोर्चा

By admin | Updated: March 11, 2015 00:14 IST

शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी : शिरोळमध्ये तहसीलदारांना निवेदन

शिरोळ : केंद्र शासन संपूर्ण देशात भूसंपादन विधेयक आणण्याचा प्रयत्न करीत आहे. हे विधेयक संमत झाले तर देशातील सर्व शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधात विधेयक असल्याने शिवसेनेने याला ठाम विरोध दर्शविण्याचा निर्णय घेतला आहे. भूसंपादन विधायक रद्द व्हावे, या मागणीकरिता शिरोळ तालुका शिवसेनेच्यावतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.विधेयक बहुमताने मंजूर झाले, तर शेतकऱ्यांची जमीन कोठेही असो, कितीही असो त्या जमीनी शेतकऱ्यांची परवानी न घेता संपादन केल्या जाणार आहेत. त्यामुळे हे विधेयक शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे, म्हणून या विधेयकास शिवसेना स्टाईलने विरोध करण्यात येत असून यापुढे आंदोलन करण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार सचिन गरी यांना देण्यात आले. आपल्या भावना शासनास कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.मोर्चात जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, तालुकाप्रमुख सतीश मलमे, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, उपतालुकाप्रमुख अ‍ॅड. संभाजीराजे नाईक, राजेंद्र पाटील, बाळासो कोकणे, राजू कदम, मंगेश चौगुले, शिरोळ शहरप्रमुख जुगल गावडे, सुरज भोसले, राजीव आवळे, मिलिंद गोरे, मंगलाताई चव्हाण, छायाताई सूर्यवंशी, माधुरी टाकारे, दयानंद मालवेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)उद्योजकांसाठी भूसंपादन विधेयकभूसंपादन विधेयक शेतकरी विरोधी आहे. भांडवलदार व छोट्या उद्योजकांसाठी सरकारने हे विधेयक आणण्याचा कुटील डाव रचला आहे. यापूर्वी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या हजोरो हेक्टर जमिनी विकासाच्या गोंडस नावाखाली कवडीमोलाने उद्योजकांना विकल्या आहेत. या गंभीर प्रश्नाकडे केंद्र शासनाने लक्ष घालणे गरजेचे असल्याने दुर्लक्ष करून शेतकरी विरोधी भूसंपादन विधेयक आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे.