शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

मतांमध्ये शिवसेनाच ‘नंबर वन’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

जिल्ह्यात प्रथमच मोठे यश : मिळविली तब्बल सव्वासात लाख मते; काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची पसंती

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या मातब्बर राजकीय पक्षांना पराभवाचे जबरदस्त धक्के देत शिवसेनेने तब्बल सहा जागा जिंकून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळविण्याचा बहुमानही मिळविला आहे. ७ लाख १८ हजार ८७९ मते मिळवून शिवसेना जिल्ह्यात ‘नंबर वन’वर राहिली. पाठोपाठ काँग्रेसने ४ लाख ८६ हजार ८२७ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसला या विधानसभेच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेला जिल्ह्यात मिळालेल्या सहा जागा आणि सर्वाधिक मते हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय झाला आहे. १९९० पासून शिवसेनेला कशीबशी कोल्हापूरची फक्त एक जागा मिळायची. २००९ मध्ये सांगली, मिरज व इचलकरंजी येथील जातीय दंगलीच्या वादळात शिवसेनेने कोल्हापूर उत्तरबरोबरच करवीर व हातकणंगले अशा तीन मतदारसंघांत विजय मिळविला. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपसोबत त्यांची आघाडी होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर आणि आरपीआय, स्वाभिमानी पक्षाची साथ मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने ‘एकला चलो रे’नारा देत लढत दिली. संघटनात्मक जाळे मजबूत नसतानाही शिवसेनेने जिल्ह्यात चांगले यश मिळविले. तब्बल सहा जागा जिंकून ‘नंबर वन’ होण्याचा मान मिळविला. कागल आणि चंदगड येथील त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेला मिळालेले यश आणि त्यांच्याकडे आकृष्ट झालेला मतदार राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत काँग्रेस (९), राष्ट्रवादी (८) भारतीय जनता पक्ष (५), स्वाभिमानी पक्ष (५) यांना सर्व मतदारसंघांत उमेदवार देता आले नाहीत; परंतु शिवसेनेने दहाही मतदारसंघांत तगडे उमेदवार दिले होते. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या दोन मतदारसंघांत मात्र त्यांच्या उमेदवारांना दहा हजारांचाही टप्पा गाठता आला नाही. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. ४ लाख ८६ हजार ८२७ इतकी मते काँग्रेसच्या पारड्यात पडली. आठ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची ३ लाख ५२ हजार ३०२ एवढी मते मिळविली. या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. चौथ्या स्थानावर अर्थातच भाजप राहिला; मात्र पाच जागा लढवून दोन जागा जिंकल्या आहेत. २५ उमेदवारांना ५00 मतेही नाहीतआमदारकीची निवडणूक लढविण्याची अनेकांना इच्छा असते; परंतु कोणी आपली राजकीय ताकद बघून या इच्छेला मुरड घालतात, तर काहीजण समाजात कसलीही ताकद अथवा नावलौकिक नसतानाही निवडणूक लढविण्याची हौस भागवून घेतात. परंतु, मतमोजणीनंतर त्यांना मिळालेली मते पाहून समाजात हेटाळणी होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील २५ उमेदवारांना ५०० मतेही मिळालेली नाहीत. त्यातील अकरा उमेदवारांनी २०० मतेसुद्धा मिळविता आलेली नाहीत. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढलेल्या एका सुशिक्षित उमेदवाराला केवळ ७८ मते मिळाली आहेत. चार पक्षांच्या ३२ उमेदवारांना १८ लाख ०८ हजार ६७३ मतेअन्य ८९ उमेदवारांना ३ लाख ८४ हजार ०३६ मते