शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये दोन्ही काँग्रेस-शिवसेना एकत्र?

By admin | Updated: March 13, 2017 23:20 IST

पंचायत समितीचे सत्ताकारण : आज सभापती, उपसभापतिपदाची निवड

जयसिंगपूर : शिरोळ पंचायत समितीतील सत्तेचा गुंता जवळपास संपुष्टात आला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आज, मंगळवारी सभापती, उपसभापतिपदाची निवड होत आहे. सभापती पद दोन्ही काँग्रेसकडे, तर उपसभापती पद शिवसेनेकडे, असा फॉर्म्युला ठरला असून, कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही काँग्रेससह शिवसेनेने पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून समजते. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेचे त्रांगडे निर्माण झाले होते. काँग्रेस तीन, राष्ट्रवादी काँग्रेस तीन, स्वाभिमानी चार, शिवसेना दोन, भाजप व अपक्ष प्रत्येकी एक, असे पंचायत समितीतील बलाबल आहे. पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेसला संधी निर्माण झाली होती. एकतर शिवसेनेची संगत अथवा स्वाभिमानीशी मिळते-जुळते घ्यावे लागेल, अशी परिस्थिती दोन्ही काँग्रेससमोर होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेपासून दूर ठेवायचे झाले, तर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून हिरवा कंदील मिळाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची शिवसेनेसोबत शनिवारी बैठक झाली. यामध्ये सत्ता स्थापनेचा निर्णय झाल्याचे समजते. आज, मंगळवारी सभापती व उपसभापतिपदाची निवड होणार आहे. प्रशिक्षणार्थी तहसीलदार एस. भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या दे. भ. रत्नाप्पाण्णा सभागृहात दुपारी दोन वाजता ही निवड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या, असून पंचायत समितीवर सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेससह शिवसेना व अपक्ष सदस्य एकत्र आल्याचे समजते. (प्रतिनिधी)सदस्य सहलीवरशनिवारी (दि.११) दोन्ही काँग्रेससह शिवसेनेची बैठक झाल्यानंतर रविवारी दोन्ही पक्षातील पंचायत समिती सदस्य सहलीवर रवाना झाले. आज मंगळवारी पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सहलीवर गेलेले सदस्य शिरोळमध्ये सकाळी दाखल होणार आहेत. निवड कोणाचीशिरोळ पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण खुल्या गटासाठी आरक्षित असल्याने संधी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. दोन्ही काँग्रेसकडे पाच महिला व एक पुरुष सदस्य आहे. पहिली संधी काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्याला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. तर उपसभापतिपदी कोण बाजी मारणार? याकडेही लक्ष लागून राहिले आहे.