शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

हद्दवाढ विरोधात शिरोली बेमुदत बंद

By admin | Updated: February 18, 2016 21:15 IST

सर्वपक्षीय बैठक : स्वतंत्र नगरपालिकेस मंजुरी देण्याची मागणी

शिरोली : कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीतून शिरोलीचे नाव वगळावे, स्वतंत्र नगरपालिकेस मंजुरी द्यावी या मागणीसाठी शुक्रवार (दि. १९)पासून शिरोली बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी बुधवारी ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण म्हणाले, महापालिकेच्या हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव जिल्हा अधिकारी अमित सैनी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीने राज्य शासनाकडे पाठविला आहे; पण हद्दवाढीत समावेश करणाऱ्या १९ गावांचे म्हणणेही जाणून घ्यायला पाहिजे होते. एकतर्फी महापालिकेच्या बाजूने हा प्रस्ताव पाठविला आहे. आमच्या गावांचा स्वतंत्र नगरपालिकेचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयात आहे. आम्हाला नगरपालिका पाहिजे, त्यासाठीच जोपर्यंत हद्दवाढीतून गावाचे नाव काढले जात नाही, तोपर्यंत शिरोली गावातील सर्व व्यवहार बेमुदत बंद राहतील.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि आमदार अमल महाडिक यांना कोणीही भेटायला जायचे नाही, या नेतेमंडळींनी आजपर्यंत शिरोलीकरांना फक्त पोकळ आश्वासने दिली आहेत, त्यांनी नगरपालिका मंजूर करायला हवी होती; पण सर्व नेत्यांनी शिरोलीकरांना फसविले आहे. ग्रामपंचायत सदस्य गोविंद घाटगे म्हणाले, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हद्दवाढ हाणून पाडूया. यावेळी उपसरपंच राजू चौगुले, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल खवरे, बबन संकपाळ, शिवसेना तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील, सलिम महात, सुरेश यादव, लियाकत गोलंदाज, विजय जाधव, शिवाजी खवरे, शिवाजी कोरवी, हरी पुजारी, बापू पुजारी, रणजित केळुसकर, राजेश पाटील, हिम्मत सर्जेखान, मधुकर पदमाई , अविनाश जाधव, काँग्रेसचे बाजीराव सातपुते, अनिल कोळी, रामचंद्र बुडकर, अशोक स्वामी, मुकुंद नाळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.सोमवारी जनावरांसह महामार्ग रोखणारशिरोली येथे प्रत्येक शनिवारी भरणारा आठवडी बाजार या शनिवारी भरणार नाही. तसेच गावातील सर्व व्यवहार बेमुदत बंद राहतील. या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे उपसरपंच राजू चौगुले म्हणाले. सोमवारी (दि.२२) गावातील नागरिक सहकुटुंब आणि जनावरांसह पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा निर्णय बैठकीत झाला.