शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ पं. स.च्या दोन अधिकाऱ्यांना अटक; लाचेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:51 IST

कोल्हापूर : शिरोळ पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग क्रमांक आठचे शाखा अभियंता संशयित तुकाराम शंकर मंगल (वय ५४, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) व हातकणंगले पंचायत समितीचे तत्कालीन उपअभियंता संशयित अशोक महादेव कांबळे (५०, सध्या रा. पुणे) या दोघांवर सोमवारी शाहूपुरी पोलिसांत लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला.पाणी योजनेच्या पूर्ण केलेल्या ...

कोल्हापूर : शिरोळ पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग क्रमांक आठचे शाखा अभियंता संशयित तुकाराम शंकर मंगल (वय ५४, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) व हातकणंगले पंचायत समितीचे तत्कालीन उपअभियंता संशयित अशोक महादेव कांबळे (५०, सध्या रा. पुणे) या दोघांवर सोमवारी शाहूपुरी पोलिसांत लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला.पाणी योजनेच्या पूर्ण केलेल्या कामाचे बिल करून देण्यासाठी दोन लाख व बिलावर सही करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित तुकाराम मंगल यांना अटक केली, तर कांबळे याला पुण्यातून अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांबळे याच्याकडे त्यावेळी शिरोळ पंचायत समितीतील कामाचा अतिरिक्त कार्यभार होता. सध्या तो पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग क्रमांक चार येथे याच पदावर आहे.पोलिसांनी सांगितले की, टाकवडे (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणी योजनेचा तीन कोटी ८० लाखांचा ठेका तक्रारदार यांच्या मित्राने आपल्या नावे २०१४ ला घेतला होता. त्यांना योजनेची वर्कआॅर्डर चार मार्च २०१४ ला मिळाली. तक्रारदार हे सुद्धा बांधकाम व्यावसायिक आहेत. मित्राला हे काम करण्यात अडचण आल्याने तक्रारदारांनी करारपत्रांद्वारे हे काम सुरू केले. तक्रारदार यांना वेळोवेळी तीन कोटी ५५ लाख रुपयांची सात बिले मिळाली. हे काम २२ मार्च २०१८ ला पूर्ण केले.उर्वरित कामाचे २५ लाखांचे बिल मिळण्यासाठी शाखा अभियंता मंगल याची त्यांनी २४ मे २०१८ ला मूल्यांकन व एम. बी. शीट तयार करून देण्यासाठी भेट घेतली. त्यांनी या कामासाठी दोन लाख रुपये मागितले तर कांबळे यांनी सही करण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने २६ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या लाचेपैकी तुकाराम मंगल यांनी एक लाख रुपये व उपअभियंता कांबळे यांना ५० हजार रुपये द्यावेत व बिल मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावी, अशी मागणी केल्याचे पंचासमक्ष पडताळणी केली असता निष्पन्न झाले. कांबळे यानेही लाच मागितल्याचे २ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केल्यावर स्पष्ट झाले होते. ‘लाचलुचपत’ कडे तक्रार झाल्याची कुणकुण लागल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात कांबळे याने २२ जूनला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा १६ जुलै रोजी शिरोळ पंचायत समिती कार्यालयातही त्यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नाही. तथापि, तपासात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने सरकारतर्फे पोलीस फिर्यादी झाले. त्या आधारे संशयित तुकाराम मंगल व अशोक कांबळे यांच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस हवालदार मनोज खोत, शरद पोरे, संदीप पावलेकर यांनी केली.लाचेसाठी घेतले आगाऊ धनादेशतडजोडीअंती कांबळे याने एक लाख ६० हजार रुपयांची मागणी केली; परंतु तक्रारदार यांनी झालेल्या कामाचे बिल न मिळाल्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर कांबळे याने तेवढ्या रकमेचे धनादेश मागितले व हे धनादेश घेतल्यावरच त्याने मूल्यांकनावर स्वाक्षºया केल्याचे व नमूद मूल्यांकनावर पूर्वीच्या तारखा टाकल्याचे निष्पन्न झाले.